Israel warns Iranians: Do not travel by train – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला आज रात्रीपर्यंत माघार घेण्याची मुदत दिली. इराणच्या अणू प्रकल्पांवर हल्ला करून इराण नष्ट करण्याची धमकी दिली, इस्रायलने इराणींना इशारा दिला की, ट्रेनने प्रवास करू नका, आम्ही हल्ला करू, पण इराण डगमगला नाही. इराणने उलट अमेरिका व इस्रायलला सुनावले की लाखो इराणी आमच्या अणू प्रकल्पाभोवती मानवी साखळी करणार आहेत, तुम्हाला जे करायचे ते करा. इराणने ट्रम्प यांनाही धमकी दिली की तुम्हाला 20 तासांची मुदत देतो, त्यानंतर असा हल्ला करू की अमेरिका पाषाण युगात पोहोचेल. या धमक्यांमुळे पुढील 48 तासांत काय होईल याची चिंता वाटू लागली आहे.
इराणला एका रात्रीत संपवू, अशी धमकी काल डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर इराणनेही अमेरिकेला तेवढेच आक्रमक प्रत्युत्तर देताना म्हटले की, अमेरिका स्वतःचे अपयश लपवते आहे. त्यांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. दुश्मनांची इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील. ट्रम्पकडे आता 20 तासांचा अवधी आहे. आम्ही त्यांना पाषाण युगात पोहोचवू. इराणच्या उर्जा प्रकल्पाबाहेर मानवी साखळी तयार करण्याचे आवाहन आम्ही नागरिकांना करीत आहोत. आमचा अणुउर्जा कार्यक्रम आम्ही थांबवणार नाही. इराणच्या राष्ट्राध्यक्षासह 1 कोटी 40 लाख इराणी स्वयंसेवक युद्धात त्यांचे प्राण देण्यासाठी तयार आहेत. इस्रायलनेही, इराणमधील लोकांनी रेल्वे प्रवास टाळावा. त्यांच्या जीवाला धोका असू शकतो, असे आवाहन केले आहे. हे आवाहन म्हणजे प्रत्यक्षात धमकीच आहे.
आखाती युद्धात मध्यस्थी देशांनी काल इराणला 45 दिवसांचा युद्धबंदीचा प्रस्ताव दिला होता. तो इराणने कालच फेटाळत तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी परिस्थितीत होर्मुज सामुद्रधुनी उघडणार नाही, असे म्हटले होते. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन इराणला धमकी दिल्यानंतरही इराणने आपला सूर अजिबात बदलला नाही. प्राण गेले तरी लढण्याचा ठाम निर्धार इराणने केला आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान आज म्हणाले की, 1.40 कोटींहून अधिक इराणी नागरिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान देण्याची तयारी दर्शवली आहे. मी स्वतः पूर्वी तयार होतो, मी आताही तयार आहे. इराणसाठी माझ्या प्राणांचे बलिदान देण्यास मी यापुढेही तयार राहीन.
ट्रम्प यांच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर इराणच्या सरकारने नागरिकांना, विशेषतः इराणी तरुणांना, ठरलेल्या वेळी देशातील वीज प्रकल्पांजवळ जमण्याचे आवाहन केले आहे. तयार होतो, मी आताही तयार आहे. इराणसाठी माझ्या प्राणांचे बलिदान देण्यास मी यापुढेही तयार राहीन.ट्रम्प यांच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर इराणच्या सरकारने नागरिकांना, विशेषतः इराणी तरुणांना, ठरलेल्या वेळी देशातील वीज प्रकल्पांजवळ जमण्याचे आवाहन केले आहे.
इराणच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवकांची मानवी साखळी या नावाने ही मोहीम राबवण्यात येत आहे. इराणच्या युवा आणि युवा परिषदेचे सचिव अलीरेझा रहिमी म्हणाले की, तरुण, खेळाडू, कलाकार, विद्यार्थी आणि विद्यापीठातील प्राध्यापकांना दुपारी 2 वाजता प्रमुख ऊर्जा पायाभूत सुविधांच्या परिसरात एकत्र यावे. या उपक्रमाचा उद्देश राष्ट्रीय पायाभूत सुविधांवर संभाव्य लष्करी हल्ले रोखण्यासाठी नागरिकांची ढाल तयार करणे आहे.
इराणच्या युवक खात्यांचे उपमंत्री अलीरेझा रहीमी म्हणाले की, सार्वजनिक सुविधांवर हल्ला करणे हा युद्ध गुन्हा असल्याचा संदेश देण्यासाठी ही कल्पना स्वतः तरुणांकडून आली आहे. ज्यातून राष्ट्रीय एकतेचे प्रदर्शन घडवण्याचा प्रयत्न आहे.
अमेरिकेने इराणला संपवण्याची धमकी दिली असतानाच इस्रायलनेही इराणला आज एक इशारा दिला. एक्सवरील इस्रायली लष्कराच्या पर्शियन भाषेतील खात्यावरून इराणी नागरिकांना असे आवाहन करण्यात आले की, त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने, इराणच्या वेळेनुसार रात्री 9 वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजेपर्यंत) संपूर्ण इराणमध्ये ट्रेनने प्रवास करणे टाळावे.
ट्रेनमध्ये किंवा रेल्वे मार्गांच्या जवळ असणे तुमच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकते. इस्रायली सैन्याने यासोबत पर्शियन भाषेत एक ग्राफिकही शेअर केले, त्यातही तातडीचा इशारा म्हणून ट्रेन आणि रेल्वे ट्रॅकपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. यात कोणत्या विशिष्ट भागांचा किंवा रेल्वे मार्गांचा उल्लेख करण्यात आला नव्हता. यावर इशार्यावर इराणच्या अधिकार्यांकडून तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, या इशार्यानंतर इराणची चिंता वाढली आहे. त्यानंतर इराणने आपल्या नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरण्याचा सल्ला दिला आहे.
आज रात्री एक संस्कृती
संपूर्ण नष्ट होईल
ट्रम्प यांनी आज सकाळी ’ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट टाकली. त्यात म्हटले की, आज रात्री एक संस्कृती संपूर्ण नष्ट होईल, जी पुन्हा कधीही परत येणार नाही. असे घडावे अशी माझी इच्छा नाही, पण कदाचित ते घडेलच. मात्र आता संपूर्ण सत्तापालट झाला असून वेगळ्या, अधिक हुशार आणि कमी कट्टर विचारांचे वर्चस्व आहे, तेव्हा कदाचित काहीतरी क्रांतिकारक अद्भुत घडू शकेल. कुणास ठाऊक? जगाच्या प्रदीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक असलेल्या आज रात्री आपल्याला ते कळेल.
मोजताबा खामेनी बेशुद्धावस्थेत?
इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी युध्दात मारले गेल्यानंतर त्यांच्या जागी सर्वोच्च धार्मिक नेतेपदी विराजमान झालेले मोजताबा खामेनी अमेरिकेच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून ते सध्या बेशुध्दावस्थेत आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत, असा दावा आज करण्यात आला. मोजताबा खामेनी यांच्यावर इराण येथे एका रुग्णालयात सध्या उपचार केले जात आहेत,असे अशी मागणी आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांनी अरब राष्ट्रांना जी गुप्त माहिती दिली होती, तिचे विश्लेषण करून मोजताबा यांच्या प्रकृतीबद्दलचे अनुमान लावण्यात आले आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यात आयातुल्ला खामेनी यांच्यासह त्यांच्या परिवारातील काही सदस्यदेखील मारले गेले.तर मोजताबा हे गंभीर जखमी झाले आहेत,असा दावा अमेरिकेने वारंवार केला आहे. मात्र इराणने या वृत्ताचे खंडण केले होते. मात्र, मागील बर्याच दिवसापासून मोजताबा एकदाही जगासमोर आलेले नाहीत.त्यांच्या नावाने इराणी प्रसारण यंत्रणा वेळोवेळी निवेदने करत आहे. त्यामुळे मोजताबा सुखरुप आहेत किंवा नाही याबद्दल जगभरात संशय व्यक्त होत आहे.
हे देखील वाचा –
लॉकडाऊन काळात बाप-लेकाचा घेतला होता बळी; न्यायालयाने 9 पोलीस अधिकाऱ्यांना सुनावली फाशी










