IPL 2026 : आयपीएल 2026 मधील दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना शेवटच्या चेंडूपर्यंत अंगावर शहारे आणणारा ठरला. गुजरातने हा सामना केवळ 1 धावेने जिंकला असला, तरी मैदानावर घडलेल्या काही घटनांमुळे आता या सामन्याच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
क्रीडाप्रेमींमध्ये हा सामना ‘फिक्स’ होता का? अशी शंका निर्माण झाली असून सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू आहे.
संशयाची सुई फिरवणारे ‘ते’ ३ प्रसंग
1. चौकार की षटकार? रिप्लेचा पत्ताच नाही सामन्याच्या एका टप्प्यावर डेव्हिड मिलरने मारलेला फटका सीमारेषेच्या अगदी जवळ पडला होता. तो चौकार आहे की षटकार हे स्पष्ट होत नव्हते. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे थर्ड अंपायरकडून कोणताही रिप्ले न पाहता मैदानावरील अंपायरने थेट चौकाराचा इशारा दिला.
That JEET wala moment 🤌🤩pic.twitter.com/7RP9QpOPf1
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 8, 2026
2. डेव्हिड मिलरने सिंगल का नाकारला? सर्वात धक्कादायक प्रसंग शेवटच्या षटकात घडला. प्रसिद्ध कृष्णाच्या पाचव्या चेंडूवर मिलरने सहज एक धाव घेतली असती तर सामना बरोबरीत सुटला असता. मात्र, चांगल्या फॉर्ममध्ये असूनही मिलरने ही धाव घेण्यास नकार दिला. शेवटच्या चेंडूवर विजय मिळवण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि तो चेंडूही त्याला खेळता आला नाही.
3. रन-आउटचा वादग्रस्त निर्णय शेवटच्या चेंडूवर मिलरचा फटका हुकला, पण तरीही फलंदाजांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला. कुलदीप यादवने धाव पूर्ण करण्यासाठी डायव्ह मारली. रिप्लेमध्ये कुलदीप क्रीझमध्ये पोहोचला होता की नाही, हे स्पष्ट दिसत नव्हते. तरीही अंपायरने घाईघाईत फलंदाजाला बाद ठरवले, ज्यामुळे गुजरातला 1 धावेने विजय मिळाला.
विनापुरावा फिक्सिंगचा दावा करणे चुकीचे असले, तरी मैदानावर घडलेल्या या घटना आणि तांत्रिक रिप्लेचा अभाव यामुळे चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. बीसीसीआय या प्रकरणावर काही स्पष्टीकरण देते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.











