Samsung Galaxy Z Flip 7 Discount: प्रीमियम आणि स्टायलिश फोन्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सॅमसंगचा लोकप्रिय फोल्डेबल स्मार्टफोन Samsung Galaxy Z Flip 7 5G आता मोठ्या सवलतीत उपलब्ध झाला आहे. गेल्या वर्षी लाँच झालेला हा फोन सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर आकर्षक डिस्काउंट आणि बँक ऑफर्ससह विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.
Samsung Galaxy Z Flip 7 Discount: किंमत आणि ऑफर्सचा धमाका
सॅमसंगने Galaxy Z Flip 7 चा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला मॉडेल 1,09,999 रुपयांना लाँच केला होता. मात्र, आता फ्लिपकार्टवर याची किंमत आणि ऑफर्स खालीलप्रमाणे आहेत:
- सवलतीतील किंमत: हा फोन सध्या 95,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे.
- बँक ऑफर: फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 4,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.
- एकूण बचत: या सर्व ऑफर्ससह फोनची प्रभावी किंमत 91,999 रुपये होते. म्हणजेच लाँच किमतीच्या तुलनेत हा फोन सुमारे 18,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
Samsung Galaxy Z Flip 7 5G चे वैशिष्ट्ये
- ड्युअल डिस्प्ले: या फोनमध्ये 6.9 इंचाचा मुख्य डायनामिक AMOLED 2X डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच, बाहेरच्या बाजूला 4.1 इंचाचा सुपर AMOLED कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे.
- प्रोसेसर आणि सॉफ्टवेअर: वेगवान परफॉर्मन्ससाठी यात Exynos 2500 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 16 वर आधारित One UI 8 वर कार्य करतो.
- कॅमेरा: फोटोग्राफीसाठी मागील बाजूस 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. सेल्फीसाठी कव्हर आणि मुख्य स्क्रीनचा वापर करता येतोच, शिवाय 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिला आहे.
- बॅटरी आणि टिकाऊपणा: फोनमध्ये 4,300mAh ची बॅटरी असून ती 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी याला IP48 रेटिंग मिळाले आहे.
- कनेक्टिव्हिटी: हा फोन 5G, वाय-फाय 7 आणि ब्लूटूथ 5.4 यांसारख्या आधुनिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह येतो.
सॅमसंगचा हा फ्लॅगशिप फोन त्याच्या युनिक डिझाइन आणि पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. अशातच झालेली ही मोठी दरवाढ ग्राहकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.











