Home / देश-विदेश / Iran US War : आखातात रक्ताचा सडा! इराण युद्धात हजारो निष्पाप बळी; लहान मुले, डॉक्टर आणि पत्रकारांचाही समावेश

Iran US War : आखातात रक्ताचा सडा! इराण युद्धात हजारो निष्पाप बळी; लहान मुले, डॉक्टर आणि पत्रकारांचाही समावेश

Iran Israel US war civilian casualties 2026 : आखाती देशांमध्ये २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेला इराण आणि इस्त्रायल- अमेरिका...

By: Team Navakal
Iran US War
Social + WhatsApp CTA

Iran Israel US war civilian casualties 2026 : आखाती देशांमध्ये २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेला इराण आणि इस्त्रायल- अमेरिका यांच्यातील संघर्ष आता भीषण वळणावर पोहोचला आहे. या युद्धात केवळ लष्करी तळांनाच नव्हे, तर नागरी वस्त्या, शाळा आणि रुग्णालयांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. मागील काही आठवड्यांत इराण आणि लेबनॉनसह संपूर्ण प्रदेशात हजारो निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये लहान मुले, वैद्यकीय कर्मचारी आणि पत्रकारांची संख्या मोठी आहे.

मृतांचा आकडा आणि भीषण वास्तव

रिपोर्टनुसार, युद्धाच्या पहिल्या काही आठवड्यांतच केवळ इराणमध्ये २,०७६ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून २६,५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. लेबनॉनमध्येही मृतांचा आकडा १,००० च्या पुढे गेला आहे. या संघर्षात इराण, लेबनॉन, इस्त्रायल आणि इराक या सर्वच देशांतील सामान्य जनता भरडली जात आहे.

या पश्चिमत आशियातील या युद्धात आखाती देशांमध्ये राहत असलेल्या काही भारतीय नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे.

चिमुकल्यांचा बळी: शाळांवरही हल्ले

या युद्धातील सर्वात हृदयद्रावक घटना इराणमधील मिनाब येथे घडली. एका मुलींच्या प्राथमिक शाळेवर झालेल्या हल्ल्यात सुमारे १६५ ते १७५ विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. इराणमधील एकूण मृतांमध्ये शेकडो लहान मुलांचा समावेश असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. अनेक ठिकाणी शाळा आणि पाणीपुरवठा केंद्रे जमीनदोस्त झाली आहेत.

रक्षकच झाले भक्ष्य: डॉक्टर आणि आरोग्यसेवकांचा मृत्यू

युद्धात जखमींवर उपचार करणाऱ्या देवदूतांनाही सोडले जात नाहीये.

  • लेबनॉन: मार्चच्या सुरुवातीला झालेल्या हल्ल्यात किमान २६ पॅरामेडिक्सचा मृत्यू झाला, तर एप्रिलपर्यंत हा आकडा ४० च्या पुढे गेला आहे.
  • इराण: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, इराण आणि लेबनॉनमधील डझनभर आरोग्य केंद्रांवर हल्ले झाले असून अनेक डॉक्टरांना प्राण गमवावे लागले आहेत.

पत्रकार आणि माध्यमांवर घाला

युद्धाची दाहकता जगासमोर मांडणाऱ्या पत्रकारांनाही या संघर्षात लक्ष्य केले गेले आहे. लेबनॉनमध्ये प्रेसचे स्टिकर असलेल्या गाडीवर झालेल्या हल्ल्यात ३ पत्रकारांचा मृत्यू झाला, तर गाझामध्ये ड्रोन हल्ल्यात एका पत्रकाराचा बळी गेला. यामुळे जगभरातील पत्रकार संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.

घटनाक्रम आणि जीवितहानी

तारीखठिकाणप्रमुख हानी
२८ फेब्रुवारी २०२६मिनाब, इराणप्राथमिक शाळेवर हल्ला; १६५-१७० विद्यार्थिनींचा मृत्यू.
१-७ मार्च २०२६इराण (विविध शहरे)पहिल्याच आठवड्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू; रुग्णालयांचे नुकसान.
१४ मार्च २०२६दक्षिण लेबनॉन१२ पॅरामेडिक्स आणि बचाव दलाच्या सदस्यांचा मृत्यू.
मार्च अखेरदक्षिण लेबनॉनचिन्हांकित प्रेस गाडीवर हल्ला; ३ पत्रकारांचा मृत्यू.
८ एप्रिल २०२६लेबनॉनएकाच दिवसाच्या बॉम्बफेकीत २५४ ठार, ११०० हून अधिक जखमी.

सध्या आखातातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसत असून, या मानवी संहाराला रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून होत असलेले प्रयत्न अपुरे पडत आहेत.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या