Home / क्रीडा / CSK vs DC IPL Controversy: मैदानावर मोठा राडा! CSK च्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा; पंचांच्या ‘त्या’ निर्णयामुळे दिल्लीचा संघ संतापला

CSK vs DC IPL Controversy: मैदानावर मोठा राडा! CSK च्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा; पंचांच्या ‘त्या’ निर्णयामुळे दिल्लीचा संघ संतापला

CSK vs DC IPL Controversy: आयपीएल 2026 मधील चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील शनिवारी झालेला सामना केवळ खेळासाठीच...

By: Team Navakal
CSK vs DC IPL Controversy
Social + WhatsApp CTA

CSK vs DC IPL Controversy: आयपीएल 2026 मधील चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील शनिवारी झालेला सामना केवळ खेळासाठीच नाही, तर एका मोठ्या वादामुळेही चर्चेत राहिला. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या लढतीत पंचांच्या एका निर्णयामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात प्रचंड संताप पाहायला मिळाला.

नेमकं प्रकरण काय?

दिल्लीचा संघ 213 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. शेवटच्या 10 चेंडूंमध्ये दिल्लीला विजयासाठी 29 धावांची गरज असताना ट्रिस्टन स्टब्सने ग्लोव्हज बदलण्यासाठी इशारा केला. मात्र, चौथ्या पंचांनी स्टब्सची ही विनंती फेटाळून लावली. यामुळे सीमारेषेवर उपस्थित असलेले दिल्लीचे कोच हेमंत बदानी, फलंदाज नितीश राणा आणि करुण नायर यांचा पंचांशी जोरदार वाद झाला.

वाद ठरला निर्णायक

पंचांनी ग्लोव्हज बदलू न दिल्यानंतर, पुढच्याच चेंडूवर ट्रिस्टन स्टब्स बाद झाला. 38 चेंडूत 60 धावांची झुंजार खेळी करणारा स्टब्स बाद झाल्याने दिल्लीच्या विजयाच्या आशा मावळल्या. समालोचन करत असलेल्या फाफ डू प्लेसिसने या घटनेचा खुलासा केला आणि सोशल मीडियावर या वादाचे व्हिडिओ वाऱ्यासारखे व्हायरल झाले.

सामन्याचा निकाल

केएल राहुल आणि पाथुम निसांका यांनी 5 षटकात 61 धावा कुटत दिल्लीला दमदार सुरुवात करून दिली होती. निसांका बाद झाल्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली. ओव्हरटन, खलील आणि अंशुल कंबोज यांनी खेळपट्टीवरील बाऊन्सचा वापर करत दिल्लीच्या फलंदाजांना जखडून ठेवले.

सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 2 बाद 212 धावा केल्या. तर धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 20 षटकात सर्वबाद 189 धावांपर्यंत मजल मारू शकला. चेन्नईने या विजयासह हंगामातील आपले खाते उघडले, तर दिल्लीला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या