Home / देश-विदेश / Noida contractor: नोएडातील २०३ ठेकेदारांना१.१६ कोटी दंड ! परवाने रद्द

Noida contractor: नोएडातील २०३ ठेकेदारांना१.१६ कोटी दंड ! परवाने रद्द

Noida contractor- नोएडा औद्योगिक क्षेत्रात गेल्या आठवड्यात कामगारांनी पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी हिंसक आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने कारवाई करायला सुरुवात केली...

By: Team Navakal
Noida Employees Protest :
Social + WhatsApp CTA

Noida contractor- नोएडा औद्योगिक क्षेत्रात गेल्या आठवड्यात कामगारांनी पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी हिंसक आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने कारवाई करायला सुरुवात केली आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथील कामगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २४ कारखान्यांशी संबंधित २०३ ठेकेदारांचे परवाने रद्द होणार असून त्यांच्याकडून दंडापोटी १ कोटी १६ लाख रुपये वसूल करण्यात येणार आहेत.त्याचबरोबर या ठेकेदारांना काळ्या यादीतही टाकले जाणार आहे.

यासंदर्भात अपर कामगार आयुक्त राकेश द्विवेदी यांनी सांगितले की, कामगारांचे शोषण करण्यामध्ये अनेक ठेकेदारांचे भूमिका संशयास्पद आढळून आली आहे. कामगार कायद्यांचे पालन न करणाऱ्या ठेकेदारांना १.१६ कोटी दंड वसुलीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.ईपीएफ आणि इएसआय वगळता अन्य कोणत्याही कारणाने कर्मचाऱ्यांच्या वेतनातून रक्कम कापली जात असल्याचे आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न देणे किंवा निश्चित वेतनापेक्षा कमी वेतन देणे असे प्रकार घडल्यास संबंधित ठेकेदाराकडून स्पष्टीकरण मागितले जाईल, असेही द्विवेदी यांनी सांगितले.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या