MHADA CEO Row: मुंबईतील गोरेगाव येथील मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाबाबत आयोजित एका जाहीर सभेत म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) संजीव जयस्वाल यांनी एका नागरिकाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.
घराच्या क्षेत्रफळावरून सुरू असलेल्या वादात जयस्वाल यांनी एका दाढी असलेल्या नागरिकाला ‘घुसखोर’ संबोधले आणि त्याचे ओळखपत्र तपासण्याचे आदेश दिले. या प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
मोतीलाल नगर 1 मधील पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन मांडण्यासाठी 17 एप्रिल रोजी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. म्हाडाने रहिवाशांना 1,600 स्क्वेअर फूट क्षेत्राचे घर देण्याची घोषणा केली. मात्र, रहिवासी 2,400 स्क्वेअर फूट घराच्या मागणीवर ठाम होते. रहिवाशांनी ‘नो’ लिहिलेले फलक दाखवत निषेध सुरू केल्यावर जयस्वाल यांचा संयम सुटला.
‘घुसखोर’ वक्तव्याने पेटला वाद
एका दाढी असलेल्या तरुणाने जेव्हा निषेधाचा फलक दाखवला, तेव्हा जयस्वाल यांनी त्याला मराठीत बोलण्यास सांगितले. तरुणाने हसून आपल्याला मराठी येत नसल्याचे सांगताच जयस्वाल संतापले. त्यांनी पोलिसांना त्याचे ओळखपत्र तपासण्याचे निर्देश दिले आणि म्हटले, “हा माणूस कुठून आला? कधी आला? इथेच जन्मला आहे की नाही, हे तपासा. जर हा घुसखोर निघाला तर त्याला इथूनच उचलून घेऊन जाईन.”
जयस्वाल यांच्या या विधानावर उपस्थित नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आणि “आम्हाला आमचे नागरिकत्व सिद्ध करण्याची गरज नाही,” अशा घोषणा दिल्या.
What a pathetic piece of shit is this officer.! What he thinks himself as emperor? @IASassociation what do you say about this arrogant officer? @Dev_Fadnavis kindly initiate disciplinary action against this officer. https://t.co/f91OaOoPix
— ಕ್ರುಶಿಕ ಎವಿ/Krushika AV (@KrishKrushik) April 19, 2026
राजकीय नेत्यांचा संताप
या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जयस्वाल यांच्यावर टीका केली आहे.
- भाजप: आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, “जयस्वाल हे जनतेचे सेवक आहेत, मालक नाहीत. त्यांनी मोतीलाल नगरमधील जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे.”
- काँग्रेस: सरचिटणीस सचिन सावंत यांनी आरोप केला की, “काही अधिकारी एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्याच्या सरकारच्या भूमिकेचे समर्थन करत आहेत. जयस्वाल यांनी विकासकाच्या फायद्याऐवजी जनतेच्या हिताचे बोलावे.”
संबंधित तरुणाने आपण लहानपणापासून याच भागात राहत असून केवळ लोकशाही मार्गाने आपली मागणी मांडत होतो, असे स्पष्ट केले. या प्रकरणी पोलीस तक्रार करण्याचा प्रयत्नही स्थानिक समितीकडून करण्यात आला आहे.
हे देखील वाचा –
UPI Payments: वारंवार UPI पेमेंट करताय? सिबिल स्कोअरवर काय परिणाम होतो? जाणून घ्या नियम











