Home / देश-विदेश / OpenAI CTO Srinivas: ओपन एआयचे सीटीओ श्रीनिवास नोकरी सोडून भारतात परतणार

OpenAI CTO Srinivas: ओपन एआयचे सीटीओ श्रीनिवास नोकरी सोडून भारतात परतणार

OpenAI CTO Srinivas : आर्टिफिशियल इन्टेलिजन्स (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा सध्या जगभरात डंका आहे. ओपन एआय ही या क्षेत्रातील दिग्गज...

By: Team Navakal
OpenAI CTO Srinivas
Social + WhatsApp CTA


OpenAI CTO Srinivas : आर्टिफिशियल इन्टेलिजन्स (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा सध्या जगभरात डंका आहे. ओपन एआय ही या क्षेत्रातील दिग्गज कंपनी आहे. या कंपनीमध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) या उच्च पदावर भारतीय वंशाचे श्रीनिवास नारायणन आहेत. मात्र त्यांनी हे मोठे पद सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीनिवास ओपन एआयसारख्या कंपनीतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून देणार आहेत. आपल्या वृध्द माता-पित्यासोबत वेळ व्यतित करावा या उद्देशाने श्रीनिवास हे उच्च पदावरील नोकरीमुळे मिळणारे सर्व भौतिक फायदे सोडून भारतात परतणार आहेत.


ओपन एआयमध्ये बिझनेस टू बिझनेस (बीटूबी) ॲप्लिकेशन्स विभागात सीटीओ पदावर ते मागील तीन वर्षांपासून कार्यरत होते. त्यांनी गेल्या महिन्यात वरिष्ठांना आपला राजीनाम्याचा निर्णय कळवला.एक्स पोस्ट करत त्यांनी सहकाऱ्यांचेही आभार मानले. ओपन एआयमधील माझा तीन वर्षांचा प्रवास बहुमुल्य होता. ही 3 वर्षे मला 10 वर्षांएवढा अनुभव देऊन गेली आहेत. तुम्हा सर्वांचे सहकार्य मला लाभले त्याबद्दल मी तुमचा सदैव ऋणी राहीन, अशा शब्दांत भावना व्यक्त करत त्यांनी भारतीय संस्कारांचे दर्शन घडवले.


श्रीनिवास ओपन एआयमध्ये सुरुवातीला ॲप्लाईड इंजिनिअरिंग टीमचे प्रमुख होते. त्यावेळचा अनुभव आणि त्यावेळच्या सहकाऱ्यांचेही श्रीनिवास यांनी आभार मानले. ॲप्लाईड इंजिनिअरिंग विभागात काम करताना आलेले अनुभव कायमस्वरुपी स्मरणात राहतील, असे श्रीनिवास म्हणाले. त्यांनी ओपन एआयचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सॅम अल्टमन तसेच कंपनीचे सह संस्थापक आणि अध्यक्ष ग्रेग ब्रोकमन आणि अन्य उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचेही मनापासून आभार मानले.

आपल्या भविष्यातील वाटचालीबाबत सांगताना श्रीनिवास म्हणाले की, तूर्त माझ्या मनात माझ्या वृद्ध माता-पित्यासोबत काही काळ व्यतित करावा हेच विचार आहेत. त्यानंतर पुढे काय करायचे ते ठरवता येईल. श्रीनिवास यांनी आयआयटी मद्रासमधून कॉम्प्युटर सायन्स या विषयात बी टेक ही पदवी मिळवली. त्यानंतर ते तावंता टेक्नॉलॉजीज या कंपनीत तंत्रज्ञान संचालक म्हणून रुजू झाले. पुढे 2007 साली त्यांनी भागीदारीमध्ये विरालिझर ही कंपनी स्थापन केली. या कंपनीत ते मुख्य तंत्रज्ञान अधिकारी होते. 2008 मध्ये त्यांनी मेटा (पूर्वाश्रमीची फेसबुक) कंपनीत अभियांत्रिकी विभागाचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. 2023 मध्ये त्यांची ओपन एआय सुरुवातीला अभियांत्रिकी विभागाचे उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. सप्टेंबर 2025 मध्ये त्यांना सीटीओपदी बढती दिली. अशा प्रकारे आपल्या करिअरमध्ये यशाची एक एक शिखरे पादाक्रांत करणारे त्यांनी वयाच्या अवघ्या चाळीशीत अमेरिकेतली नोकरी सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या