Home / लेख / CNP Nashik Recruitment: नोटा छापणाऱ्या कंपनीत ५३४ जागांची मेगाभरती! ६७,००० पगार; लगेच करा अर्ज

CNP Nashik Recruitment: नोटा छापणाऱ्या कंपनीत ५३४ जागांची मेगाभरती! ६७,००० पगार; लगेच करा अर्ज

CNP Nashik Recruitment: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी नाशिकमधून एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत सरकारच्या मालकीच्या ‘करन्सी...

By: Team Navakal
CNP Nashik Recruitment
Social + WhatsApp CTA

CNP Nashik Recruitment: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी नाशिकमधून एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत सरकारच्या मालकीच्या ‘करन्सी नोट प्रेस’मध्ये तब्बल ५३४ रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नाशिकमधील दोन महत्त्वाच्या प्रेससह हैदराबाद आणि देवास येथील प्रेसमध्येही ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

कुठे किती जागा रिक्त?

या मेगाभरती अंतर्गत एकूण ५३४ जागा भरल्या जाणार आहेत. त्याचे विभागवार तपशील खालीलप्रमाणे आहेत:

  • इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक: २७९ जागा
  • करन्सी नोट प्रेस, नाशिक: १२४ जागा
  • सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस, हैदराबाद: ६९ जागा
  • बँक नोट प्रेस, देवास: ६२ जागा

पगार आणि महत्त्वाची पदे

या भरतीमध्ये सुरक्षा अधिकारी, सुपरवायझर (टेक्निकल, आयटी, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल), आर्टिस्ट आणि ज्युनिअर ऑफिस असिस्टंट यांसारख्या २१ विविध पदांची नियुक्ती केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना ६७,००० रुपयांपासून पुढे आकर्षक वेतन दिले जाणार आहे.

अर्ज कसा आणि कधी करायचा?

  • ऑनलाईन अर्ज: उमेदवारांना https://cnpnashik.spmcil.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल.
  • महत्त्वाच्या तारखा: २० एप्रिल २०२६ पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून, १९ मे २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • परीक्षा शुल्क: खुला आणि ओबीसी प्रवर्गासाठी १,००० रुपये, तर एससी/एसटी आणि दिव्यांगांसाठी केवळ २०० रुपये फी आहे.

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड ऑनलाईन लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे यात चुकीच्या उत्तरासाठी गुण कापले जाणार नाहीत (No Negative Marking). काही तांत्रिक पदांसाठी टायपिंग टेस्ट देखील घेतली जाईल. लेखी परीक्षेत किमान ४५ ते ५५ टक्के गुण मिळवणारे उमेदवार पात्र ठरतील.

हे देखील वाचा – 

Apple New CEO: कोण आहेत ॲपलचे नवीन बॉस जॉन टर्नस? जाणून घ्या त्यांची संपत्ती आणि पगार

Indian Cricket: भारतीय क्रिकेटमध्ये मोठी क्रांती! एकाच वेळी खेळणार टीम इंडियाचे दोन संघ; बीसीसीआयने आखला ‘हा’ मास्टर प्लॅन

Germany Gurdwara Clash : जर्मनीतील गुरुद्वारात राडा! तलवारी आणि पेप्पर स्प्रेने एकमेकांवर हल्ला; ४० जणांच्या टोळक्याने माजवला धुमाकूळ

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या