Home / देश-विदेश / Germany Gurdwara Clash : जर्मनीतील गुरुद्वारात राडा! तलवारी आणि पेप्पर स्प्रेने एकमेकांवर हल्ला; ४० जणांच्या टोळक्याने माजवला धुमाकूळ

Germany Gurdwara Clash : जर्मनीतील गुरुद्वारात राडा! तलवारी आणि पेप्पर स्प्रेने एकमेकांवर हल्ला; ४० जणांच्या टोळक्याने माजवला धुमाकूळ

Germany Gurdwara Clash : जर्मनीतील नॉर्थ राईन-वेस्टफेलिया राज्यातील मोअर्स शहरात असलेल्या ‘गुरुद्वारा सिंग सभा’ येथे प्रचंड हिंसाचार झाला. गुरुद्वाराच्या व्यवस्थापन...

By: Team Navakal
Germany Gurdwara Clash
Social + WhatsApp CTA

Germany Gurdwara Clash : जर्मनीतील नॉर्थ राईन-वेस्टफेलिया राज्यातील मोअर्स शहरात असलेल्या ‘गुरुद्वारा सिंग सभा’ येथे प्रचंड हिंसाचार झाला. गुरुद्वाराच्या व्यवस्थापन समितीचे नियंत्रण आणि आर्थिक व्यवहारांच्या वादातून दोन गट एकमेकांना भिडले. या संघर्षात 40 हून अधिक लोक सहभागी होते, ज्यांनी पेप्पर स्प्रे, चाकू आणि किरपाणचा वापर केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमका प्रकार काय घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, प्रार्थना सभा सुरू होण्यापूर्वीच एका गटाने दुसऱ्या गटावर नियोजित हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी सुरुवातीला पेप्पर स्प्रेचा वापर करून समोरच्यांना गोंधळात टाकले आणि त्यानंतर शस्त्रांनी हल्ले केले. या राड्यात किमान 11 जण जखमी झाले असून काहींच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. परिस्थिती इतकी भीषण होती की, घाबरलेले भाविक अनवाणी पायाने गुरुद्वाराबाहेर पळताना दिसले.

वादाचे मूळ ‘गोलक’ आणि वर्चस्व

हा संपूर्ण वाद गुरुद्वाराच्या व्यवस्थापन समितीवर कोणाचे वर्चस्व असावे, यावरून सुरू असल्याचे समजते. माजी समिती सदस्य आणि सध्याचे सदस्य यांच्यात पैशांच्या व्यवहारांवरून आणि ‘गोलक’मधील (दानपेटी) निधीवरून जुना वाद होता. जुन्या समितीने पुन्हा ताबा मिळवण्याच्या प्रयत्नातून हा हल्ला केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

पोलिसांची कमांडो कारवाई

हिंसाचाराची माहिती मिळताच जर्मन पोलिसांनी मोठी मोहीम राबवली. सुमारे 100 पोलीस अधिकारी आणि विशेष कार्य दलाच्या (SEK) जवानांनी गुरुद्वाराला वेढा घातला. बंदुकधारी हल्लेखोर आत असण्याच्या भीतीने पोलिसांनी मशिनगनसह इमारतीत प्रवेश केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. प्राथमिक तपासात पोलिसांना घटनास्थळी गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत.

शीख समुदायाकडून संताप

पवित्र गुरुद्वारात अशा प्रकारे हिंसाचार झाल्याने शीख समुदायातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “ज्या किरपाणचा वापर संरक्षणासाठी व्हायला हवा, तीच एकमेकांविरुद्ध उपसली गेली आणि गुरुग्रंथ साहेबांच्या उपस्थितीत पगड्या हवेत उडाल्या, हे अत्यंत लाजीरवाणे आहे,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

हे देखील वाचा – Arvind Kejriwal Case: “न्याय दबावाला बळी पडत नाही”; केजरीवाल यांनी पक्षपातीपणाचे आरोप केलेल्या न्यायमूर्तींनी सुनावणीतून बाजूला होण्यास दिला नकार

Web Title:
संबंधित बातम्या