Home / महाराष्ट्र / TCS Company Case : ‘फिगर झिरो आहे, गरज पडल्यास बोलाव’; गुढीपाडव्याला साडीचा पदर ओढण्याइतकी मजल;टीसीएसमधील छळाने नाशिक हादरलं!

TCS Company Case : ‘फिगर झिरो आहे, गरज पडल्यास बोलाव’; गुढीपाडव्याला साडीचा पदर ओढण्याइतकी मजल;टीसीएसमधील छळाने नाशिक हादरलं!

TCS Company Case : प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान कंपनी ‘टीसीएस’च्या नाशिक शाखेतील धर्मांतर आणि महिला छळवणूक प्रकरणामुळे कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी खळबळ...

By: Team Navakal
TCS Company Case 
Social + WhatsApp CTA

TCS Company Case : प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान कंपनी ‘टीसीएस’च्या नाशिक शाखेतील धर्मांतर आणि महिला छळवणूक प्रकरणामुळे कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना बेड्या ठोकल्या असून, मुख्य सूत्रधार मानली जाणारी मानवी संसाधन (HR) अधिकारी निदा खान मागील २० दिवसांपासून फरार आहे. पीडित महिला कर्मचाऱ्याने पोलिसांना दिलेल्या जबाबातून या कार्यालयात सुरू असलेल्या भयानक आणि लज्जास्पद प्रकारांचा पर्दाफाश झाला आहे.

लैंगिक छळवणूक आणि अर्वाच्च वर्तन-
पीडितेने दिलेल्या जबाबातील माहितीनुसार, कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी रजा मेनन आणि आसिफ अन्सारी हे महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक व शारीरिक छळ करत होते. “तुझी शरीरयष्टी (फिगर) आकर्षक आहे, गरज पडली तर कधीही बोलावू,” अशा शब्दांत हे अधिकारी जाहीरपणे टिप्पणी करत असत. धक्कादायक बाब म्हणजे, हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र अशा ‘गुढीपाडवा’ सणाच्या दिवशी रजा मेनन याने पीडितेच्या साडीचा पदर ओढून तिचा विनयभंग केला. तिने मागे वळून पाहिल्यावर त्याने अत्यंत ओंगळवाण्या नजरेने तिच्याकडे पाहून हास्य केल्याचे पीडितेने नमूद केले आहे.

धार्मिक श्रद्धांवर आघात आणि धर्मांतराचा प्रयत्न-
या प्रकरणात केवळ लैंगिक छळवणूकच नव्हती, तर कर्मचाऱ्यांच्या धार्मिक श्रद्धांनाही लक्ष्य केले जात होते. आरोपी पीडितेला आणि इतर कर्मचाऱ्यांना “तुमचा महादेव खरोखरच देव आहे का?” किंवा “गणपती हे महादेवाचे पुत्र आहेत का?” अशा प्रकारचे प्रश्न विचारून त्यांच्या धर्माची थट्टा करत असत. हिंदुत्वाचा अपमान करून हळूहळू धर्मांतरासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या टोळीकडून केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

मानसिक खच्चीकरण आणि ‘प्लेअर’ संबोधनाचा वापर-
जबाबातील माहितीनुसार, आसिफ अन्सारी कार्यालयात जागा उपलब्ध असतानाही जाणीवपूर्वक पीडितेच्या जवळ येऊन बसायचा आणि लज्जास्पद स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. रजा मेनन हा पीडितेला कार्यालयात “काय चाललंय प्लेअर?” असे संबोधून टोमणे मारायचा. कामात मदत करण्याच्या बहाण्याने तिला जवळ बोलावणे, घाणेरड्या कमेंट्स करणे आणि सतत मानसिक दडपणाखाली ठेवणे, असा प्रकार या कंपनीत सुरू होता.

नाशिक टीसीएस छळवणूक प्रकरण: व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे तरुणींचे मानसिक खच्चीकरण; मुख्य सूत्रधार निदा खानचा ‘धर्मांतर प्लॅन’ उघड-
या प्रकरणातील संशयित आरोपींच्या जप्त केलेल्या मोबाईलमधून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान असे दिसून आले आहे की, आरोपींनी जाणीवपूर्वक हिंदू तरुणींना लक्ष्य करण्यासाठी एका विविक्षित कार्यपद्धतीचा अवलंब केला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि अश्लील पासवर्डचा धक्कादायक प्रकार-
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अंतर्गत संवाद साधण्यासाठी काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केले होते. या ग्रुप्समध्ये दररोज आक्षेपार्ह संदेश पाठवून तरुणींचा विनयभंग केला जात असे. इतकेच नव्हे, तर कार्यालयातील इंटरनेटचा (वाय-फाय) पासवर्ड देखील अश्लील शब्दांत किंवा हिंदू तरुणींच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीने ठेवला जात होता. शफी शेख आणि रझा मेमन या आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी आपल्या मोबाईलमधील बराचसा डेटा हटवल्याची (डिलिट) दाट शक्यता आहे. त्यामुळे तपास यंत्रणा आता हे तांत्रिक पुरावे पुन्हा मिळवण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेत आहे.

निदा खान: ऑपरेशन डिपार्टमेंटच्या नावाखाली धर्मांतराचा कट
या संपूर्ण प्रकरणाची मुख्य सूत्रधार निदा खान हिच्या कार्यपद्धतीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कंपनीत मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून कार्यरत असलेली निदा खान, दैनंदिन कामाच्या नियोजनासाठी (मीटिंग) बोलावलेल्या सभांचा वापर हिंदू मुलींचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी करत असे. ‘ऑपरेशन डिपार्टमेंट’च्या नावाखाली ती तरुणींना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्यासाठी इतर आरोपींना आदेश देत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पीडित महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळ हा या मोठ्या कटाचाच एक भाग होता, ज्याचा मुख्य उद्देश धर्मांतर करणे हाच होता.

आरोपींच्या कोठडीत वाढ आणि फरार निदाचा शोध
गेल्या २५ दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी तीन विशेष पथके तैनात केली आहेत. मात्र, अद्याप तिचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. दरम्यान, या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या इतर आरोपींना पुन्हा पोलीस कोठडीत घेऊन त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या