Home / महाराष्ट्र / Gunratan Sadavarte : भाईंदरमध्ये ‘मराठी सक्ती’वरून राडा; गुणरत्न सदावर्ते आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने; परिसरात तणाव

Gunratan Sadavarte : भाईंदरमध्ये ‘मराठी सक्ती’वरून राडा; गुणरत्न सदावर्ते आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने; परिसरात तणाव

Gunratan Sadavarte : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयावरून आता मुंबईच्या उपनगरांत राजकीय ठिणगी पडली आहे. या...

By: Team Navakal
Gunratan Sadavarte
Social + WhatsApp CTA

Gunratan Sadavarte : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयावरून आता मुंबईच्या उपनगरांत राजकीय ठिणगी पडली आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. गुणरत्न सदावर्ते थेट मैदानात उतरले असून, भाईंदरमध्ये यावरून सदावर्ते समर्थक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) कार्यकर्ते यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. दोन्ही बाजूंनी झालेल्या घोषणाबाजीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नेमके प्रकरण काय?
राज्य सरकारच्या निर्णयानुसार, १ मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. या निर्णयाला काही रिक्षा चालक संघटनांनी विरोध दर्शवला असून, या आंदोलनाचे नेतृत्व आता ॲड. गुणरत्न सदावर्ते करत आहेत. याच पार्श्वभूमीवर सदावर्ते बुधवारी भाईंदरमध्ये दाखल झाले होते. त्यांनी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांची भेट घेतली आणि त्यानंतर ‘न्यू गोल्डन नेस्ट’ परिसरात रिक्षा चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते.

मनसेचा आक्रमक पवित्रा आणि घोषणाबाजी-
सदावर्ते हे मराठी सक्तीविरोधात बैठक घेणार असल्याची माहिती मिळताच मनसेचे स्थानिक कार्यकर्ते आक्रमक झाले. “राज ठाकरे यांचा अपमान सहन केला जाणार नाही” आणि “मराठी भाषेचा सन्मान राखलाच पाहिजे,” अशा घोषणा देत मनसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सदावर्ते आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका करताना “ही वैचारिक दिवाळखोरी आहे” असे प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे संघर्ष अधिकच पेटला.

पोलिसांची मध्यस्थी आणि धरपकड-
दोन्ही गटांतील वाद विकोपाला जात असल्याचे पाहून घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईनंतर बैठक पार पडली असली, तरी संपूर्ण भाईंदर परिसरात या घटनेचे पडसाद उमटले असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भाषेच्या मुद्द्यावरून राजकीय ध्रुवीकरण-
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र पुन्हा एकदा दोन गटांत विभागला गेल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे मनसे आणि मराठी अस्मितेचे समर्थक या निर्णयाचे स्वागत करत आहेत, तर दुसरीकडे सदावर्ते यांच्या नेतृत्वाखालील संघटना याला कायदेशीर आणि घटनात्मक विरोध करत आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या