Home / महाराष्ट्र / KEM Hospital : केईएम रुग्णालय नामांतरावरून वाद; नाव बदलापेक्षा सुविधा द्या -मार्डची मागणी

KEM Hospital : केईएम रुग्णालय नामांतरावरून वाद; नाव बदलापेक्षा सुविधा द्या -मार्डची मागणी

मुंबईतील ऐतिहासिक केईएम (KEM Hospital) रुग्णालयाच्या नामांतराच्या (Rename)प्रस्तावावरून वाद निर्माण झाला आहे. निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने (MARD) या निर्णयाला कडाडून...

By: Team Navakal
KEM Hospital
Social + WhatsApp CTA


मुंबईतील ऐतिहासिक केईएम (KEM Hospital) रुग्णालयाच्या नामांतराच्या (Rename)प्रस्तावावरून वाद  निर्माण झाला आहे. निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने (MARD) या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे. नाव बदलण्याऐवजी रुग्णालयातील मूलभूत समस्या सोडवाव्यात, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे.

मार्डने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केईएम (King Edward Memorial) रुग्णालय हा केवळ एक इमारत नसून ऐतिहासिक वारसा (Heritage) असल्याचे नमूद केले आहे. या संस्थेचे शैक्षणिक (Academic), वैद्यकीय (Medical) आणि सार्वजनिक (Public) महत्त्व मोठे असल्याने नामांतराचा निर्णय निराशाजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) नागरी आरोग्य समितीने शुक्रवारी रुग्णालयाचे नाव बदलून “कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल” रुग्णालय असा प्रस्ताव मंजूर केला. हा प्रस्ताव पुढील प्रशासकीय मंजुरीसाठी (Administrative Approval) आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे.

मार्डने प्रशासनाला हा प्रस्ताव फेटाळण्याची मागणी करत रुग्णसेवा आणि डॉक्टरांच्या कल्याणासाठी ठोस सुधारणा (Reforms) करण्याचा आग्रह धरला आहे. सध्या रुग्णालयात वसतिगृहांची कमतरता (Hostel Issue), लिफ्ट वारंवार बंद पडणे आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना विद्यावेतन वेळेवर न मिळणे यांसारखे प्रश्न गंभीर आहेत.

पुन्हा चर्चेला उधाण

केईएम रुग्णालय हे मुंबईतील एक प्रमुख आणि ऐतिहासिक आरोग्य केंद्र मानले जाते. त्यामुळे या नामांतराच्या मुद्द्यावर यापूर्वीही राजकीय (Political) आणि आरोग्य क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता पुन्हा हा मुद्दा पुढे आल्याने महापालिकेत आणि राजकीय वर्तुळात चर्चा वाढण्याची शक्यता आहे.

‘प्रतीकात्मक बदल नकोत, सुविधा द्या’

मार्डने स्पष्ट केले की, प्रशासनाने केवळ प्रतीकात्मक बदलांवर भर न देता आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करणे आवश्यक आहे. जर नवीन ओळख निर्माण करायची असेल, तर आधुनिक सुविधा असलेले नवीन रुग्णालय उभारावे, अशी मागणीही डॉक्टरांनी केली आहे.

मंगलप्रभात लोढा यांचे पालिकेला पत्र

राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha)यांनी मुंबई महानगरपालिकेला अधिकृत पत्र लिहून रुग्णालयाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे.मंगलप्रभात लोढा यांनी यापूर्वीही या रुग्णालयाच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित केला होता.

जानेवारी महिन्यात आयोजित कार्यक्रमातही त्यांनी ही मागणी मांडली होती. आता पुन्हा अधिकृत पत्राद्वारे त्यांनी या प्रक्रियेला गती देण्याचे आवाहन केले आहे. लोढा यांच्या प्रस्तावानुसार, ब्रिटिश काळातील ‘केईएम’ हे नाव बदलून भारतीय संस्कृतीशी सुसंगत नाव देण्यात यावे, अशी त्यांची भूमिका आहे. त्यांनी “कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय” असे नवीन नाव सुचवले असून, त्यामुळे संक्षिप्त रूप ‘केईएम’ कायम राहील, असा दावाही करण्यात आला आहे.

दरम्यान, केईएम रुग्णालय हे मुंबईतील एक प्रमुख आणि ऐतिहासिक रुग्णालय मानले जाते. त्यामुळे या नामांतराच्या मागणीवर यापूर्वीही राजकीय आणि आरोग्य क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता पुन्हा एकदा हा मुद्दा समोर आल्याने मुंबई महापालिकेत आणि राजकीय वर्तुळात चर्चा आणि वादाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


हे देखील वाचा –

 लाडकी बहिण योजनेत मोठा घोटाळा; ११ कोटींची वसुली सुरू

‘आप’ सोडली तरी खासदारकी का जाणार नाही? जाणून घ्या राघव चड्ढा आणि 6 खासदारांच्या ‘सेफ गेम’मागचे गणित

कोकणचा राजा रडतोय! हापूसच्या उत्पादनात 80 टक्क्यांची घट; यंदा देवगडच्या बागांमधून आंब्यांचा सुगंधच गायब

Web Title:
संबंधित बातम्या