Home / देश-विदेश / Fuel Price Update:  पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होणार का? सरकारने दिले स्पष्टीकरण

Fuel Price Update:  पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होणार का? सरकारने दिले स्पष्टीकरण

Fuel Price Update: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असल्याने आणि निवडणुकांनंतर इंधन महागणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने केंद्र...

By: Team Navakal
Fuel Price Update
Social + WhatsApp CTA

Fuel Price Update: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असल्याने आणि निवडणुकांनंतर इंधन महागणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने केंद्र सरकारने मोठे स्पष्टीकरण दिले आहे. २९ एप्रिल रोजी पश्चिम बंगालमधील मतदान संपल्यानंतर पेट्रोल किंवा डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्याचा विचार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Fuel Price Update : अफवांमुळे पेट्रोल पंपांवर रांगा

इंधन दरवाढीच्या अफवांमुळे देशातील काही भागांत, विशेषतः आंध्र प्रदेशमध्ये नागरिकांनी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी मागणीत ३० ते ३३ टक्क्यांनी वाढ झाल्याने जवळपास ४०० पेट्रोल पंप रिकामे पडल्याचे वृत्त समोर आले होते. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, इंधनाचा पुरवठा पुरेसा असून नागरिकांनी ‘पॅनिक बाइंग’ करू नये.

Fuel Price Update : सरकारचा दरवाढीला नकार

पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले की, “पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन नाही. सर्व किरकोळ विक्री केंद्रांवर लक्ष ठेवले जात असून पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेतली जात आहे.” त्यांनी जनतेला अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Fuel Price Update : तेल कंपन्यांवर वाढता दबाव

सरकारने दरवाढ नाकारली असली तरी सरकारी तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ५० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. सध्या तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर २० रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर १०० रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही एप्रिल २०२२ पासून भारतात इंधन दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

जागतिक बाजारपेठेतील स्थिती

पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी ७० डॉलर्स प्रति बॅरल असलेले कच्चे तेल या महिन्यात सरासरी ११४ डॉलर्सच्या पार गेले आहे.

हे देखील वाचा – Meghalaya Murder Case: पतीच्या हत्येचा आरोप असलेल्या सोनम रघुवंशीला अखेर जामीन; १० महिन्यांनंतर तुरुंगाबाहेर, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Web Title:
संबंधित बातम्या