Raja Shivaji Box Office Collection : मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार रितेश देशमुख याच्या बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वादळी सुरुवात केली आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असूनही, या ऐतिहासिक ॲक्शन ड्रामाने पहिल्याच दिवशी कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.
आगाऊ नोंदणीमध्ये विक्रमी प्रतिसाद मिळाल्यानंतर, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.
Raja Shivaji Box Office Collection : पहिल्या दिवसाची रेकॉर्डब्रेक कमाई
एकाच वेळी अनेक चित्रपट प्रदर्शित झालेले असतानाही ‘राजा शिवाजी’ने आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. ‘सॅकनिल्क’च्या ताज्या अहवालानुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी १०.८२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये विशेष म्हणजे हिंदी व्हर्जनमधून २.७२ कोटी रुपये आले असून, उर्वरित मोठी कमाई मूळ मराठी व्हर्जनमधून झाली आहे. रात्रीच्या शोमध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहता हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे.
Raja Shivaji Box Office Collection : मध्यरात्रीचे शो सुरू करण्याचा निर्णय
रिपोर्टनुसार, या चित्रपटाची मागणी इतकी प्रचंड आहे की अनेक सिनेमागृहांमध्ये जागा अपुरी पडत आहे. सध्या अनेक चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे ‘राजा शिवाजी’ला पुरेशा स्क्रीन मिळवण्यात अडचणी येत होत्या. मात्र, प्रेक्षकांचा वाढता ओघ पाहून अनेक मल्टिप्लेक्स साखळींनी मध्यरात्री १२ नंतरचे ‘पोस्ट-मिडनाईट’ शो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांच्या क्रेझी डिमांडमुळे चित्रपटगृहांच्या मालकांनी हा मोठा बदल केला आहे.
Raja Shivaji Box Office Collection : दिग्गजांची मांदियाळी आणि भव्यता
रितेश देशमुखने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यात त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, भाग्यश्री, महेश मांजरेकर आणि बोमन इराणी यांसारख्या तगड्या कलाकारांच्या भूमिका आहेत. अत्यंत भव्य कॅनव्हासवर साकारलेल्या या चित्रपटात उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि थरारक ॲक्शन पाहायला मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा आणि त्यांचा जाज्वल्य इतिहास मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर रांगा लावल्या आहेत.
हे देखील वाचा –










