Home / महाराष्ट्र / HSC Result 2026: बारावीचा निकाल कसा पाहायचा? मोबाईलवर रिझल्ट पाहण्यासाठी ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

HSC Result 2026: बारावीचा निकाल कसा पाहायचा? मोबाईलवर रिझल्ट पाहण्यासाठी ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

How to check HSC Result 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (HSC Result 2026) निकाल आज,...

By: Team Navakal
How to check HSC Result 2026
Social + WhatsApp CTA

How to check HSC Result 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (HSC Result 2026) निकाल आज, २ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. अनेकदा निकाल जाहीर झाल्यानंतर वेबसाईटवर गर्दी वाढल्यामुळे ती संथ चालते. अशा वेळी आपला बारावीचा निकाल कसा पाहायचा, असा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांना पडतो. तुमच्या मोबाईलवर अवघ्या दोन मिनिटांत निकाल पाहण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

HSC Result 2026 : बारावीचा निकाल कसा पाहायचा?

तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर खालील स्टेप्स वापरून निकाल पाहू शकता:

१. अधिकृत वेबसाईट उघडा: सर्वात आधी तुमच्या ब्राऊझरमध्ये mahresult.nic.in ही लिंक ओपन करा.

२. निकाल लिंकवर जा: होमपेजवर तुम्हाला ‘HSC Examination March – 2026 Result’ अशी लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.

३. तुमचा तपशील भरा: आता तुमच्या हॉल तिकीटवरील ‘Roll Number’ (आसन क्रमांक) टाईप करा.

४. आईचे नाव: त्यानंतर खाली दिलेल्या रकान्यात ‘Mother’s First Name’ (आईच्या नावातील पहिली ३ अक्षरे) टाका.

५. रिझल्ट पहा: सर्व माहिती भरल्यानंतर ‘View Result’ या बटणावर क्लिक करा. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

६. सेव्ह करा: निकालाची स्क्रीनशॉट काढा किंवा ती प्रत पीडीएफ म्हणून डाऊनलोड करा.

HSC Result 2026 : निकाल पाहण्यासाठी महत्त्वाच्या लिंक्स:

जर एक वेबसाईट चालत नसेल, तर तुम्ही खालील पर्यायी वेबसाईटवर निकाल पाहू शकता:

HSC Result 2026 : मार्कशीटमध्ये काही चूक असल्यास काय करावे?

निकाल पाहिल्यानंतर तुमच्या गुणांची पडताळणी करायची असेल किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी असेल, तर तुम्ही ३ मे पासून ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर ‘गुणपडताळणी’ (Verification) विभागात जाऊन शुल्क भरावे लागेल.

हे देखील वाचा – Maharashtra Day 2026: 1 मे हाच दिवस महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा केला जातो? वाचा सविस्तर इतिहास

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या