Home / लेख / Amazon Sale: प्रीमियम फोन घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण! Samsung Galaxy S25 Ultra वर 35 हजार रुपयांची सूट; पाहा फीचर्स

Amazon Sale: प्रीमियम फोन घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण! Samsung Galaxy S25 Ultra वर 35 हजार रुपयांची सूट; पाहा फीचर्स

Samsung Galaxy S25 Ultra Amazon Sale Deal : तुम्ही जर एखादा प्रीमियम स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी...

By: Team Navakal
Samsung Galaxy S25 Ultra
Social + WhatsApp CTA

Samsung Galaxy S25 Ultra Amazon Sale Deal : तुम्ही जर एखादा प्रीमियम स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. ॲमेझॉनने आपल्या ‘ग्रेट समर सेल’ची घोषणा केली असून, हा सेल 8 मे पासून सर्वांसाठी खुला होणार आहे. या सेलमध्ये अनेक महागडे स्मार्टफोन स्वस्त दरात मिळणार आहेत. विशेषतः सॅमसंगचा सर्वात शक्तिशाली फोन Galaxy S25 Ultra खरेदी करण्याची ही उत्तम वेळ आहे.

Samsung Galaxy S25 Ultra वर मोठी सवलत

सॅमसंग Galaxy S25 Ultra ची मूळ किंमत साधारणपणे 1,29,999 रुपयांपासून सुरू होते. मात्र, ॲमेझॉनच्या या सेलमध्ये हा फोन केवळ 94,999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. म्हणजेच ग्राहकांना या फोनवर तब्बल 35,000 रुपयांपर्यंतची मोठी सूट मिळणार आहे. या किमतीमध्ये बँक ऑफर्स आणि कूपन डिस्काउंटचाही समावेश असू शकतो. याशिवाय जुना फोन बदलून (एक्सचेंज ऑफर) आणि विनाव्याज हप्त्यांवर (नो-कॉस्ट ईएमआय) हा फोन अधिक स्वस्त दरात घेता येईल.

Samsung Galaxy S25 Ultra : सेलचा ‘अर्ली ॲक्सेस’ कधी?

ॲमेझॉन प्राईम मेंबर्ससाठी या सेलचा अर्ली ॲक्सेस आज म्हणजेच 5 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झाला आहे. त्यामुळे प्राईम मेंबर्स आतापासूनच या सवलतीचा फायदा घेऊ शकतात.

Samsung Galaxy S25 Ultra ची खास वैशिष्ट्ये:

बॅटरी आणि एआय: फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी असून गुगल जेमिनी एआयचे खास फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत.

डिस्प्ले: या फोनमध्ये 6.9 इंचाचा फ्लॅट डिस्प्ले असून त्याची ब्राइटनेस 2600 निट्सपर्यंत जाते.

प्रोसेसर: उत्तम कामगिरीसाठी यात स्नॅपड्रॅगन 8 एलीट प्रोसेसर देण्यात आला आहे.

रॅम: हा फोन 12GB ते 16GB रॅमच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

कॅमेरा: फोटोग्राफीसाठी यात 200 मेगापिक्सेलचा क्वाड-कॅमेरा सेटअप आहे, जो एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. यात 4K 120fps लॉग व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधाही मिळते.

हे देखील वाचा – West Bengal CM Race: बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय! आता मुख्यमंत्री कोण? ‘या’ नावांची जोरदार चर्चा

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या