Home / महाराष्ट्र / Raj Thackeray on Nasrapur Case : “त्या नराधमाला हालहाल करून संपवा!” नसरापूर प्रकरणावर राज ठाकरेंचा संताप; सरकारला विचारले बोचरे सवाल

Raj Thackeray on Nasrapur Case : “त्या नराधमाला हालहाल करून संपवा!” नसरापूर प्रकरणावर राज ठाकरेंचा संताप; सरकारला विचारले बोचरे सवाल

Raj Thackeray on Nasrapur Case : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात एका साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या...

By: Team Navakal
Raj Thackeray on Nasrapur Case
Social + WhatsApp CTA

Raj Thackeray on Nasrapur Case : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात एका साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एक्स’वर एक सविस्तर पोस्ट लिहीत आपला संताप व्यक्त केला आहे.

“आरोपीला हालहाल करून संपवा”

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “या घटनेने मनाचा थरकाप उडाला असून भयानक चीड आली आहे. सरकारने कायद्याचा किंवा इतर कोणाच्याही मताचा विचार न करता, त्या नराधमाला हालहाल करून संपवावे.” सरकारने केवळ ‘फास्टट्रॅक’ कारवाईचे आश्वासन न देता, अशा नराधमांना कायद्याचा धाक दाखवावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

राज ठाकरेंनी उपस्थित केलेले काही महत्त्वाचे मुद्दे:

  • कायद्याचा धाक संपलाय: महाराष्ट्रात महिला आणि मुलींच्या शोषणाचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. याचा अर्थ गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती उरलेली नाही.
  • आंदोलकांवर लाठीमार का?: नसरापूर परिसरात न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी लाठीमार केला. ही तत्परता पोलीस गुन्हेगारांना पकडण्यासाठी का दाखवत नाहीत? असा बोचरा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.
  • सत्तेचा भस्मासुर: राजकारणापासून साहित्य संमेलनापर्यंत प्रत्येक ठिकाणी केवळ ‘सत्ता’ मिळवण्याची स्पर्धा सुरू आहे. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याच्या या वृत्तीचे प्रतिबिंब समाजात खालच्या थरापर्यंत उमटत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
  • विस्कटलेली मूल्यव्यवस्था: मोबाईलमधील अतिगुंतवणूक, ओटीटीवरील कंटेंट आणि पैशांमागची धाव यामुळे समाजातील जुनी मूल्यव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. लोकांच्या मनात आता ‘छीथू’ होईल ही भीतीदेखील उरलेली नाही.

महाराष्ट्राचे ‘लक्ष’ आणि ‘लक्ष्य’ विचलित

राज ठाकरे पुढे म्हणाले की, ज्या महाराष्ट्राने स्त्री शिक्षणाचा आणि सक्षमीकरणाचा पाया घातला, तिथेच अशा घटना वारंवार घडणे चिंताजनक आहे. राजकारणी, प्रसारमाध्यमे आणि समाजाने यावर मूलभूत विचार करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राचे भरकटलेले ‘लक्ष्य’ पुन्हा एकदा ताळ्यावर आणण्यासाठी सरकारने तातडीने कृती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हे देखील वाचा – West Bengal CM Race: बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय! आता मुख्यमंत्री कोण? ‘या’ नावांची जोरदार चर्चा

Web Title:
संबंधित बातम्या