Home / देश-विदेश / Women Safety: महिला आयुक्तांनी मध्यरात्री बस स्टॉपवर उभं राहून केलं ‘अंडरकव्हर’ ऑपरेशन; पुढं जे घडलं ते पाहून तुम्हीही हादराल!

Women Safety: महिला आयुक्तांनी मध्यरात्री बस स्टॉपवर उभं राहून केलं ‘अंडरकव्हर’ ऑपरेशन; पुढं जे घडलं ते पाहून तुम्हीही हादराल!

Women Safety: शहरातील रस्ते रात्रीच्या वेळी महिलांसाठी किती सुरक्षित आहेत, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी मलकाजगिरीच्या पोलीस आयुक्त व्ही. सुमती यांनी...

By: Team Navakal
Women Safety: महिला आयुक्तांनी मध्यरात्री बस स्टॉपवर उभं राहून केलं 'अंडरकव्हर' ऑपरेशन; पुढं जे घडलं ते पाहून तुम्हीही हादराल!
Social + WhatsApp CTA

Women Safety: शहरातील रस्ते रात्रीच्या वेळी महिलांसाठी किती सुरक्षित आहेत, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी मलकाजगिरीच्या पोलीस आयुक्त व्ही. सुमती यांनी एक धाडसी पाऊल उचलले. तेलंगणातील हैदराबाद येथील गजबजलेल्या दिलसुखनगर भागात त्यांनी मध्यरात्री साध्या वेशात बस स्टॉपवर उभे राहून ‘अंडरकव्हर’ ऑपरेशन राबवले. या मोहिमेदरम्यान अवघ्या ३ तासांत जे समोर आले, ते अत्यंत चिंताजनक आणि संतापजनक आहे.

नेमकी मोहीम काय होती?

मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएस अधिकारी सुमती यांनी मध्यरात्री 12.30 ते पहाटे 3.30 च्या दरम्यान दिलसुखनगर भागातील एका बस स्टॉपवर सामान्य प्रवाशाप्रमाणे उभ्या राहिल्या. रात्रीच्या वेळी एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, याचा अनुभव घेण्यासाठी त्या तिथे थांबल्या होत्या. यावेळी साध्या वेश्यातील पोलिसांचे पथक परिसरात आधीच तैनात करण्यात आले होते.

४० जणांनी गाठले, काही नशेत तर काही विद्यार्थी!

३ तासांच्या या मोहिमेत तब्बल 40 पुरुषांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यात धक्कादायक बाब म्हणजे, यातील अनेक जण मद्य किंवा गांजाच्या नशेत असल्याचे संशय होता. यामध्ये केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकच नव्हते, तर काही तरुण विद्यार्थी आणि खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी असल्याचेही समोर आले आहे. त्यांच्या वर्तनावरून आणि हालचालींवरून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांची तात्काळ कारवाई

संशयास्पद वर्तन करणाऱ्या आणि महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना परिसरात तैनात असलेल्या साध्या वेश्यातील पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. काही जणांना समज देऊन सोडण्यात आले, तर काहींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तींचे समुपदेशनही केले.

मोहिमेचा उद्देश काय?

  1. रात्रीची गस्त: पोलीस गस्त किती प्रभावीपणे सुरू आहे, याचा अंदाज घेणे.
  2. संवेदनशील ठिकाणे: महिलांसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या सार्वजनिक ठिकाणांची ओळख पटवणे.
  3. सुरक्षेचा आढावा: एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे.

या मोहिमेमुळे पोलीस प्रशासनातील त्रुटी आणि समाजातील काही घटकांची मानसिकता उघड झाली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या आकस्मिक मोहिमा भविष्यातही राबवल्या जातील, असे संकेत पोलीस विभागाने दिले आहेत.

हे देखील वाचा – West Bengal CM Race: बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय! आता मुख्यमंत्री कोण? ‘या’ नावांची जोरदार चर्चा

Web Title:
संबंधित बातम्या