Rahul Gandhi Instagram Post: तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला राहुल गांधी यांनी हजेरी लावली होती. या ऐतिहासिक क्षणाचे काही फोटो आणि व्हिडिओ राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केले. मात्र, अवघ्या काही वेळातच इन्स्टाग्रामने ही पोस्ट ‘ब्लॉक’ केल्याचा दावा काँग्रेसने केला असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय श्रीवत्सा यांनी ‘X’ वर पोस्ट करत असा दावा केला की, राहुल गांधी आणि थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातील फोटोंची पोस्ट इन्स्टाग्रामने ब्लॉक केली आहे. त्यांच्या मते, अवघ्या १ तासात या व्हिडिओला १२ दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते, तर फोटोंनी ४६ दशलक्ष लोकांपर्यंत पोहोच मिळवली होती. काँग्रेसने यामागे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे नियम कारणीभूत असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेत्याचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप केला.
मंत्रालयाचे स्पष्टीकरण: नेमके काय घडले?
काँग्रेसच्या या आरोपांनंतर माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) तातडीने स्पष्टीकरण दिले आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांची पोस्ट ब्लॉक करण्यामागे केंद्र सरकारचा कोणताही हात नाही.
- तांत्रिक चूक: इन्स्टाग्रामच्या अंतर्गत यंत्रणेने चुकीच्या पद्धतीने ही पोस्ट फ्लॅग केली होती, ज्यामुळे ती तात्पुरती ब्लॉक झाली.
- पोस्ट पूर्ववत: ही तांत्रिक चूक लक्षात येताच इन्स्टाग्रामने राहुल गांधी यांची पोस्ट पुन्हा रिस्टोअर केली आहे.
राजकीय चर्चांना उधाण
राहुल गांधी बऱ्याच काळापासून त्यांचे सोशल मीडिया रीच, युट्यूब व्ह्यूज आणि फॉलोअर्स कमी केले जात असल्याचा आरोप करत आहेत. अशातच तमिळ चित्रपटसृष्टीतील महानायक ‘थलपती’ विजय यांच्या राजकीय प्रवेशाच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे सोशल मीडियावर मोठ्या चर्चा सुरू आहेत.
सध्या ही पोस्ट पुन्हा सर्व प्रवाशांना आणि चाहत्यांना पाहायला मिळत असून, इन्स्टाग्रामने ही तांत्रिक चूक असल्याचे मान्य केले आहे.
हे देखील वाचा – PM Modi Appeal: इंधनाची बचत करा आणि वर्षभर सोनं खरेदी टाळा! पंतप्रधान मोदींचे देशाला मोठे आवाहन; पाहा नक्की असे का म्हणाले?










