Mouni Roy Divorce Rumours: बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार यांच्या सुखी संसारात वादळ निर्माण झाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. लग्नाला अवघी काही वर्षे झाली असतानाच हे जोडपे विभक्त होणार असल्याच्या अफवांनी चाहत्यांची चिंता वाढवली आहे.
Mouni Roy Divorce Rumours: इन्स्टाग्रामवरील हालचालींमुळे संशय बळावला
या दोघांमधील बिनसल्याच्या चर्चांना तेव्हा सुरुवात झाली जेव्हा नेटकऱ्यांच्या लक्षात आले की, मौनी आणि सूरजने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सूरज नांबियारने आपले इन्स्टाग्राम अकाउंटच पूर्णपणे बंद (Delete) केले आहे.
दुसरीकडे, मौनी रॉयच्या प्रोफाइलवरून सूरजसोबतचे सर्व फोटो, अगदी त्यांच्या लग्नाचे खास क्षणही गायब झाले आहेत. यामुळे हे जोडपे आता एकत्र नाही का, असा प्रश्न विचारला जात आहे.
Mouni Roy Divorce Rumours: काही महिन्यांपूर्वीच एकत्र आले होते दिसले
या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये मौनी आणि सूरज यांना अभिनेत्री दिशा पटानीसोबत एकत्र पाहिले गेले होते. एका व्हायरल व्हिडिओमध्ये मौनी अचानक खाली पडली होती, तेव्हा सूरजनेच तिला सावरून कारपर्यंत नेले होते. त्यावेळी त्यांच्यात सर्व काही आलबेल असल्याचे दिसत होते, मात्र अचानक घडलेल्या या बदलांनी सर्वांनाच चकित केले आहे.
Mouni Roy Divorce Rumours: २०२२ मध्ये झाले होते थाटात लग्न
मौनी रॉय आणि सूरज नांबियार २७ जानेवारी २०२२ रोजी गोव्यात विवाहबंधनात अडकले होते. मल्याळी आणि बंगाली अशा दोन्ही पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला होता. सूरज हा मूळचा बंगळुरूचा असून तो दुबईत इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून कार्यरत होता. लग्नानंतर हे दोघेही सातत्याने आपले रोमँटिक फोटो आणि व्हॅकेशनचे व्हिडिओ शेअर करत असत.
मौनी रॉयची कारकीर्द
प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय असलेल्या ‘नागिन’ मालिकेमुळे मौनी घराघरात पोहोचली. ‘देवों के देव महादेव’ आणि ‘कस्तुरी’ यांसारख्या मालिकांनंतर तिने ‘ब्रह्मास्त्र’, ‘गोल्ड’ आणि ‘मेड इन चायना’ यांसारख्या चित्रपटांतून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. दरम्यान, या घटस्फोटाच्या चर्चांवर मौनी किंवा सूरज यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.
हे देखील वाचा – NEET-UG 2026 Re-exam Date: पेपरफुटीच्या आरोपानंतर NEET परीक्षा पुन्हा कधी होणार? NTA ने दिली माहिती










