Kamgar Ayuktalay Recruitment Details: महाराष्ट्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्तालय, मुंबई अंतर्गत ‘गट-क’ (Group C) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आहे.
या सरळसेवा भरती २०२६ च्या माध्यमातून राज्यातील २२ माथाडी मंडळे आणि १२ सुरक्षा रक्षक मंडळांच्या कार्यालयांमध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीची संपूर्ण परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
कोणती पदे भरली जाणार? (एकूण जागा – ७८)
या भरती मोहिमेद्वारे वेगवेगळ्या विभागातील एकूण ७८ रिक्त जागा भरल्या जातील. शासनाच्या गरजेनुसार भविष्यात या जागा वाढू देखील शकतात. पदांचा सविस्तर तपशील आणि मिळणारे वेतन खालीलप्रमाणे आहे:
- निरीक्षक (Inspector) – ६२ जागा: या पदासाठी रु. ३५,४०० ते रु. १,१२,४०० (वेतन श्रेणी एस-१३) यासोबतच सरकारी नियमांनुसार इतर भत्ते मिळतील.
- लेखापाल (Accountant) – १२ जागा: या पदासाठीही रु. ३५,४०० ते रु. १,१२,४०० (वेतन श्रेणी एस-१३) हीच आकर्षक वेतन श्रेणी लागू आहे.
- लघुटंकलेखक (Steno-Typist) – ०४ जागा: या पदासाठी रु. २५,५०० ते रु. ८१,१०० (वेतन श्रेणी एस-८) आणि इतर भत्ते देय असतील.
शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पदांनुसार खालील पात्रता पूर्ण करावी लागेल:
- निरीक्षक: मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी (Graduation) असणे आवश्यक.
- लेखापाल: वाणिज्य शाखेची (B.Com) पदवी आणि संबंधित क्षेत्रातील किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य.
- लघुटंकलेखक: कोणत्याही शाखेची पदवी, सोबत मराठी/इंग्रजी शॉर्टहँड ८0 श.प्र.मि. आणि टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे.
पदांसाठी उमेदवारांना मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असणे बंधनकारक आहे.
वयोमर्यादा: उमेदवाराचे वय किमान १९ वर्षे असणे आवश्यक आहे. कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे आणि मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) तसेच अनाथ उमेदवारांसाठी ४३ वर्षे ठेवण्यात आली आहे. दिव्यांग व प्रकल्पग्रस्तांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल.
महत्त्वाच्या तारखा नक्की नोंदवून ठेवा
- अर्ज भरण्यास सुरुवात: १३ मे २०२६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ जून २०२६ (रात्री २३:५५ वाजेपर्यंत)
- ऑनलाईन फी भरण्याची अंतिम तारीख: १२ जून २०२६
इच्छुक उमेदवारांना एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास, प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरून वेगळा अर्ज सादर करावा लागेल.
थेट ऑनलाईन अर्जाची लिंक
- या भरतीची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी उमेदवार कामगार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात: अधिकृत वेबसाईट: https://mahakamgar.maharashtra.gov.in
- थेट ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि फॉर्म भरण्यासाठी खालील लिंकचा वापर करा: अर्जाची लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/Index.html
हे देखील वाचा – CJI Surya Kant: “काही तरुण झुरळांसारखे…”; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अखेर मोठे स्पष्टीकरण!












