Home / arthmitra / Fixed Deposit Rates: ५ लाख रुपयांच्या FD वर मिळेल बंपर परतावा! ‘या’ खाजगी बँक देत आहेत ७.३५% पर्यंत व्याज; पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Fixed Deposit Rates: ५ लाख रुपयांच्या FD वर मिळेल बंपर परतावा! ‘या’ खाजगी बँक देत आहेत ७.३५% पर्यंत व्याज; पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Fixed Deposit Rates: जर तुमच्याकडे 5 लाख रुपये असून तुम्ही ते सुरक्षित गुंतवणुकीसाठी फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडीमध्ये ठेवण्याचा विचार करत...

By: Team Navakal
Fixed Deposit Rates
Social + WhatsApp CTA

Fixed Deposit Rates: जर तुमच्याकडे 5 लाख रुपये असून तुम्ही ते सुरक्षित गुंतवणुकीसाठी फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडीमध्ये ठेवण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सध्याच्या घडीला अनेक खाजगी बँका ग्राहकांना 1 वर्ष, 3 वर्षे आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी वेगवेगळ्या दराने आकर्षक व्याज देत आहेत.

विशेष म्हणजे, काही बँकांमध्ये 3 वर्षे किंवा त्याहून कमी कालावधीच्या एफडीवर व्याजदर थेट 7.00% ते 7.20% च्या पार गेले आहेत.

एफडी निवडताना दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या लागतात, पहिली म्हणजे व्याजाचा दर आणि दुसरी म्हणजे तो दर किती कालावधीसाठी मिळत आहे. लेटेस्ट डेटाच्या आधारे ५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 7% पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या टॉप बँकांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

Fixed Deposit Rates: कोणती बँक किती व्याज देत आहे?

  • CSB Bank: सध्या सर्वात जास्त व्याज देणाऱ्या बँकांमध्ये सीएसबी बँक आघाडीवर आहे. ही बँक 18 महिन्यांच्या कालावधीसाठी थेट 7.35% व्याज देत आहे.
  • SBM Bank India: ही बँक 18 महिने ते 2 वर्षे 3 दिवस या कालावधीच्या एफडीवर 7.30% दराने व्याज देत आहे.
  • IDFC First Bank: या बँकेत 500 दिवस ते 3 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 7.25% इतका उत्तम व्याजदर दिला जात आहे.
  • Tamilnad Mercantile Bank: या बँकेकडून 567 दिवसांच्या विशेष कालावधीसाठी 7.25% दराने व्याज मिळत आहे.
  • RBL Bank: आरबीएल बँक ग्राहकांना 18 महिने ते 3 वर्षे या कालावधीवर 7.20% व्याज ऑफर करत आहे.
  • Yes Bank: युएस बँकेत 18 महिने ते 35 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 7.00% दराने व्याज दिले जात आहे.

या व्यतिरिक्त अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसीआय बँक यांसारख्या मोठ्या खाजगी बँकांचे व्याजदर सध्या 7% पेक्षा कमी आहेत.

Fixed Deposit Rates: असे समजून घ्या ५ लाखांवरील कमाईचे गणित

लेटेस्ट आकडेवारीनुसार, जर तुम्ही सर्वात जास्त व्याज देणाऱ्या सीएसबी बँकेत (CSB Bank) 18 महिन्यांसाठी (सुमारे दीड वर्ष) 5 लाख रुपयांची एफडी केली, तर तुम्हाला किती फायदा होईल ते पाहूया:

  • एकूण गुंतवणूक: 5,00000 रुपये
  • व्याजाचा दर: 7.35%
  • कालावधी: 18 महिने
  • मिळणारे एकूण व्याज (नफा): 57,103 रुपये
  • मॅच्युरिटीनंतर मिळणारी एकूण रक्कम: 5,57,103 रुपये

म्हणजेच, केवळ दीड वर्षात तुमच्या ५ लाख रुपयांवर तुम्हाला ५७ हजार रुपयांपेक्षा जास्त निव्वळ नफा मिळू शकतो. त्यामुळे तुमची रक्कम गुंतवण्यापूर्वी बँकांचे हे नवीन दर नक्की लक्षात घ्या.

हे देखील वाचा – Pune Dagdusheth Ganpati: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मिळाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या