SBI Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्यांसाठी एक उत्तम संधी समोर आली आहे. SBI ने कॉनकरंट ऑडिटर्सच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण 821 जागा भरल्या जाणार आहेत. या जागा पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार असून सुरुवातीला हा करार किमान 1 वर्ष ते कमाल 3 वर्षांचा असेल.
पात्र आणि इच्छुक उमेदवार 11 जून 2026 किंवा त्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही, तर पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे थेट निवड केली जाईल.
या भरतीशी संबंधित अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा, पात्रता आणि मानधन याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज भरण्यास सुरुवात: 14 मे 2026
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2026
- अधिकृत संकेतस्थळ: https://sbi.bank.in/
पात्रता आणि अटी
एसबीआयमधून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून त्यासाठी खालील निकष ठरवण्यात आले आहेत:
- निवृत्तीचे स्वरूप: उमेदवार वयाची 60 वर्षे पूर्ण करून एसबीआय सेवेतून सेवानिवृत्त झालेला असावा.
- निवृत्तीची श्रेणी: अधिकारी MMGS-III, SMGS-IV/V किंवा TEGS-VI या श्रेणीतून निवृत्त झालेले असावेत.
- वयोमर्यादा: नवीन नियुक्तीसाठी कमाल वय 63 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तसेच हा कार्यकाळ वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंतच असू शकतो.
- अनुभव: निवृत्त कर्मचाऱ्यांना क्रेडिट, ऑडिट किंवा फॉरेक्स क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
श्रेणीनुसार मिळणारे मासिक मानधन
या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या निवृत्तीच्या श्रेणीनुसार दरमहा ठराविक मानधन दिले जाईल. हे मानधन त्यांच्या पेन्शनव्यतिरिक्त असेल:
- MMGS-III: 45,000 रुपये दरमहा
- SMGS-IV: 50,000 रुपये दरमहा
- SMGS-V: 65,000 रुपये दरमहा
- TEGS-VI: 80,000 रुपये दरमहा
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम बँकेच्या अधिकृत करिअर पेजला (https://www.sbi.bank.in/web/careers/current-openings) भेट द्या.
- ऑनलाईन अर्ज पूर्ण भरल्यानंतर सिस्टीमद्वारे एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड जनरेट होईल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवारांना आपला अर्ज सुधारण्यासाठी 3 वेळा संधी दिली जाईल.
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रांच्या डिजिटल प्रती योग्य फॉर्मॅटमध्ये अपलोड करा.
- सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवा.
हे देखील वाचा – Pune Dagdusheth Ganpati: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मिळाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा










