Home / महाराष्ट्र / Ketan Agrawal : ४०० फूट दरीत ढकलूनही अंगात धुगधुगी होती? ‘तो’ शब्द ऐकताच खुनी सिया का घाबरली?  संगीता तिवारींचा लोहगड हत्या प्रकरणात सर्वात खळबळजनक आणि आक्रमक खुलासा..

Ketan Agrawal : ४०० फूट दरीत ढकलूनही अंगात धुगधुगी होती? ‘तो’ शब्द ऐकताच खुनी सिया का घाबरली?  संगीता तिवारींचा लोहगड हत्या प्रकरणात सर्वात खळबळजनक आणि आक्रमक खुलासा..

Ketan Agrawal : विवाह ठरलेल्या केतन अग्रवाल यांची त्यांची होणारी पत्नी सिया गोयल हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने लोहगडावरून ४०० फूट...

By: Team Navakal
Ketan Agrawal
Social + WhatsApp CTA

Ketan Agrawal : विवाह ठरलेल्या केतन अग्रवाल यांची त्यांची होणारी पत्नी सिया गोयल हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने लोहगडावरून ४०० फूट खोल दरीत ढकलून देऊन हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास अत्यंत वेगाने सुरू असतानाच, पुण्याच्या ज्येष्ठ राजकीय नेत्या संगीता तिवारी यांनी या संदर्भात काही अत्यंत खळबळजनक दावे केले आहेत, ज्यामुळे या प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

“अंगात धुगधुगी आहे” ऐकताच सियाची उडाली होती गाळण
संगीता तिवारी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना घटनेच्या दिवसाचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग समोर आणला. त्यांनी दावा केला की, “लोहगडावरील खोल दरीतून जेव्हा केतनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने ‘केतनच्या अंगात अजूनही धुगधुगी (प्राण) शिल्लक आहे, त्याचा जीव वाचू शकतो; तातडीने रस्ता मोकळा करा आणि रुग्णवाहिका बोलवा’ असे मोठ्याने सांगितले. हे शब्द ऐकताच तिथेच जवळ उभी असलेली मुख्य आरोपी सिया गोयल अत्यंत दचकली आणि घाबरून बाजूला झाली.” केतन जर जिवंत राहिला, तर आपला संपूर्ण कट आणि कारस्थान उघडकीस येईल, याच भीतीने सिया ग्रासली गेल्याचे त्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने आपल्याला सांगितल्याचा दावा तिवारी यांनी केला आहे.

चारित्र्य आणि जीवनशैलीवर गंभीर आरोप
या संवेदनशील प्रकरणावर बोलताना संगीता तिवारी यांनी सिया गोयलच्या वैयक्तिक जीवनशैलीवर आणि वर्तनावरही अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. सियाला अत्यंत अनिबंध सवयी होत्या. काही काळापूर्वी ती आपल्याच ३-४ मैत्रिणींच्या प्रियकरांना (बॉयफ्रेंड्स) सोबत घेऊन महाबळेश्वरला पर्यटनासाठी गेली होती. तिथून परत आल्यानंतर संतप्त मैत्रिणींनी जेव्हा तिला या वर्तनाबद्दल जाब विचारला, तेव्हा तिने त्यांची माफी मागितली होती. यावरून तिच्या मैत्रिणींनी तिच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला होता.

कोरेगाव पार्क आणि मुंढव्यातील रात्रीच्या पार्ट्या
सियाच्या दैनंदिन दिनचर्येबाबत बोलताना तिवारी यांनी सांगितले की, सियाला रात्रीच्या वेळी पार्ट्यांमध्ये जाण्याचे प्रचंड व्यसन होते. रात्री साडेआठच्या सुमारास तिचे वडील झोपायला गेल्यानंतर, ती रात्री अकरा वाजता पूर्ण तयारीनिशी घरातून बाहेर पडत असे. त्यानंतर पुण्याच्या कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरातील विविध हाय-फाय क्लब्स व पार्ट्यांमध्ये ती रात्री घालवायची आणि पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास घरी परतत असे, असा दावाही त्यांनी केला.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या