Home / क्रीडा / Gurnoor Brar : 6 फूट 5 इंच उंची आणि घातक वेग; टीम इंडियात निवड झालेला गुरनूर ब्रार नक्की कोण आहे?

Gurnoor Brar : 6 फूट 5 इंच उंची आणि घातक वेग; टीम इंडियात निवड झालेला गुरनूर ब्रार नक्की कोण आहे?

Gurnoor Brar Indian Test Team Selection : अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाची घोषणा...

By: Team Navakal
Gurnoor Brar : 6 फूट 5 इंच उंची आणि घातक वेग; टीम इंडियात निवड झालेला गुरनूर ब्रार नक्की कोण आहे?
Social + WhatsApp CTA

Gurnoor Brar Indian Test Team Selection : अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाची घोषणा केली आहे. या संघात ३ अनकॅप्ड म्हणजेच आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या युवा खेळाडूंना पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात बोलावणे आले आहे.

सध्या सुरू असलेल्या IPL 2026 चा भाग असलेले मानव सुथार आणि हर्ष दुबे यांना संधी मिळालीच आहे, पण या सर्वांमध्ये एका ६ फूट ५ इंच उंच वेगवान गोलंदाजाच्या नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा खेळाडू म्हणजेच पंजाबचा युवा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार होय.

Gurnoor Brar Indian Test Team Selection :गुजरात टायटन्सचा भाग, पण देशांतर्गत क्रिकेटमुळे चमकला

गुरनूर ब्रार सध्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. या हंगामात त्याला अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही, मात्र देशांतर्गत क्रिकेटमधील (डोमेस्टिक क्रिकेट) त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला थेट भारतीय कसोटी संघाचे तिकीट मिळाले आहे. पंजाबकडून खेळताना त्याने आपल्या वेगाच्या आणि उंचीमुळे मिळणाऱ्या बाऊन्सच्या जोरावर प्रतिस्पर्धी फलंदाजांना चांगलेच जेरीस आणले होते.

गुरनूर ब्रारची आतापर्यंतची कामगिरी खालीलप्रमाणे आहे:

  • प्रथम श्रेणी पदार्पण: त्याने 2022 मध्ये आपले प्रथम श्रेणी क्रिकेट पदार्पण केले होते.
  • धमाकेदार मोसम: खऱ्या अर्थाने तो 2024-25 च्या हंगामात चमकला. त्याने 7 सामन्यात तब्बल 26 बळी घेतले. यात बिहारविरुद्ध 14 धावांत 5 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
  • शानदार इकॉनॉमी: त्या संपूर्ण हंगामात त्याने 12 सामन्यांमध्ये 3.43 च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटने 33 विकेट्स घेतल्या.
  • शेर-ए-पंजाब टी-20 लीग: या स्पर्धेतही तो 11 सामन्यांत 22 विकेट्स घेऊन सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता.

Gurnoor Brar Indian Test Team Selection :आयपीएलचा प्रवास आणि करोडोंची बोली

गुरनूर ब्रारचा आयपीएलमधील प्रवास २०१९ मध्ये मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर म्हणून सुरू झाला होता. त्यानंतर 2023 मध्ये त्याने पंजाब किंग्सकडून आपले आयपीएल पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीचे फळ त्याला आयपीएल 2025 च्या लिलावात मिळाले, जेव्हा गुजरात टायटन्सने त्याला 1.3 कोटी रुपयांची मोठी बोली लावून आपल्या संघात सामील केले. नुकत्याच झालेल्या भारत अ (India A) संघाच्या सामन्यांमध्येही त्याने आपल्या गोलंदाजीने निवडकर्त्यांना प्रभावित केले होते.

Gurnoor Brar Indian Test Team Selection : कर्णधार शुभमन गिलसोबतचे खास कनेक्शन

भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याच्याशी गुरनूरचे जुने नाते आहे. याबद्दल एका मुलाखतीत सांगताना गुरनूर म्हणाला होता, “मी अंडर-19 च्या दिवसांपासून शुभमन गिलला नेटमध्ये गोलंदाजी करायचो. तो जेव्हा भारताच्या अंडर-19 संघात खेळत होता, तेव्हा त्याने माझे कौतुक केले होते. माझी गोलंदाजी पाहून त्यानेच मला जिल्हा संघात स्थान मिळवून देण्यासाठी मदत केली. त्यानंतर मी मोहालीकडून खेळलो आणि पुढे पंजाबच्या अंडर-23 संघात माझी निवड झाली.”

हे देखील वाचा – PM Modi Norway Visit: पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करणारी ‘ती’ परदेशी पत्रकार कोण? सोशल मीडियावर तुफान चर्चा

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या