Home / देश-विदेश / Eknath Shinde : एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले! सोबत ‘तो’ बडा शिक्षणसम्राट; दिल्लीत नेमकं घडलं काय?

Eknath Shinde : एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले! सोबत ‘तो’ बडा शिक्षणसम्राट; दिल्लीत नेमकं घडलं काय?

Eknath Shinde : राज्यात विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत...

By: Team Navakal
Eknath Shinde
Social + WhatsApp CTA

Eknath Shinde : राज्यात विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. रविवारी पार पडलेल्या या भेटीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. विशेष म्हणजे, या दौऱ्यात त्यांच्यासोबत शिवसेनेचे एक माजी मंत्री आणि राज्यातील बडे ‘शिक्षणसम्राट’ उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रात्रीचा निरोप आणि ‘खाजगी’ प्रवास
अधिकच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चार दिवसांपूर्वीच दिल्लीत दाखल झाले होते. दोन दिवसांच्या या वास्तव्यात त्यांनी अमित शाह यांची भेट घेण्याचे वारंवार प्रयत्न केले; मात्र शाह यांची वेळ मिळू न शकल्याने त्यांना रिकाम्या हाती महाराष्ट्रात परतावे लागले होते. असे असूनही, शिंदेंनी आपले प्रयत्न थांबवले नाहीत. अखेर शनिवारी रात्री उशिरा अमित शाह यांच्याकडून भेटीचा निरोप आल्यानंतर, रविवारी उपमुख्यमंत्री कोणालाही सुगावा लागू न देता एका खाजगी विमानाने तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले. ही भेट इतकी गुप्त ठेवण्यात आली होती की, शिंदेंसोबत त्यांचा एकही वैयक्तिक सहाय्यक किंवा सुरक्षा ताफा उपस्थित नव्हता. शाह यांच्याशी चर्चा आटोपल्यानंतर शिंदे दिल्लीहून थेट बंगळुरूला गेले आणि तिथून ते ठाण्यातील आपल्या निवासस्थानी परतले.

एकनाथ शिंदे यांची अस्वस्थता आणि ‘ऑपरेशन टायगर’-
एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यातील या बंद दाराआड झालेल्या चर्चेचा अधिकृत तपशील अद्याप गुलदस्त्यात असला, तरी मुख्यमंत्री गेल्या काही दिवसांपासून प्रचंड अस्वस्थ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीमध्ये आपल्या गटाची कोंडी होत असल्याची भावना त्यांच्या मनात घर करून आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि पक्षाचा विस्तार करण्यासाठी शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्याची योजना आखली आहे; परंतु या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी अद्याप दिल्लीतील भाजप नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. याच संदर्भात त्यांनी अमित शाह यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याचे बोलले जात आहे.

सोबत असलेला ‘शिक्षणसम्राट’ कोण? चर्चांना वेग
या संपूर्ण दौऱ्यात सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे उपमुख्यमंत्र्यांसोबत असलेला ‘शिक्षणसम्राट’. शिवसेनेचे माजी मंत्री असलेल्या या बड्या नेत्याचे मध्यंतरी उपमुख्यमंत्र्यांशी संबंध ताणले गेले होते. हा नेता शिंदे यांच्यावर काहीसा नाराज असल्याचे मानले जात होते. मात्र, अचानक त्यांनी उपमुख्यमंत्र्यांसोबत दिल्ली गाठल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Web Title:
For more updates: , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या