Home / लेख / Pune School Bus Fee Hike: पुणेकरांना महागाईचा झटका! 1 जूनपासून स्कूल बसच्या शुल्कात मोठी वाढ; खिशावर पडणार ‘एवढा’ अतिरिक्त भार

Pune School Bus Fee Hike: पुणेकरांना महागाईचा झटका! 1 जूनपासून स्कूल बसच्या शुल्कात मोठी वाढ; खिशावर पडणार ‘एवढा’ अतिरिक्त भार

Pune School Bus Fee Hike: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील पालकांसाठी एक अत्यंत चिंतेची बातमी समोर आली आहे. येत्या 1 जूनपासून...

By: Team Navakal
Pune School Bus Fee Hike: पुणेकरांना महागाईचा झटका! 1 जूनपासून स्कूल बसच्या शुल्कात मोठी वाढ; खिशावर पडणार 'एवढा' अतिरिक्त भार
Social + WhatsApp CTA

Pune School Bus Fee Hike: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील पालकांसाठी एक अत्यंत चिंतेची बातमी समोर आली आहे. येत्या 1 जूनपासून शाळांच्या बस प्रवासासाठी पालकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. स्कूल बस ऑपरेटर असोसिएशनने स्कूल बसच्या शुल्कात थेट 15 ते 20 टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगदी काही दिवस आधीच हा निर्णय घेण्यात आल्यामुळे पालकांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Pune School Bus Fee Hike: दरमहा किती रुपयांचा पडणार फरक?

पुणे आणि पिंपरी-चिंचवड बस असोसिएशनच्या स्कूल ट्रान्सपोर्ट विंगची एक महत्त्वाची बैठक गुरुवारी पुण्यात पार पडली, ज्यामध्ये हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. बस चालकांनी दिलेल्या माहितीनुसार:

  • अतिरिक्त भार: या शुल्कवाढीमुळे पालकांना आता प्रत्येक विद्यार्थ्यांमागे दरमहा सुमारे 300 ते 500 रुपये जास्त द्यावे लागतील.
  • कधीपासून लागू होणार: हे नवीन वाढीव दर 1 जून 2026 पासून लागू होणार आहेत.

राज्यात स्टेट बोर्डाच्या शाळा 15 जूनपासून सुरू होत आहेत, तर काही खाजगी आणि इतर आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळा त्याआधीच सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळा सुरू होताच पालकांना हा वाढीव भुर्दंड सहन करावा लागेल.

Pune School Bus Fee Hike: बस चालकांकडून दरवाढीचे काय दिले कारण?

पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनावणे यांनी या शुल्कवाढीचे समर्थन करताना सांगितले की, ही वाढ आम्ही अतिरिक्त नफा कमावण्यासाठी केलेली नाही. गेल्या काही काळापासून वाढलेल्या खर्चामुळे बस चालवणे कठीण झाले होते. बस चालकांनी दरवाढीमागे खालील प्रमुख कारणे सांगितली आहेत:

  • इंधनाचे गगनाला भिडलेले दर: गेल्या एका वर्षात डिझेलच्या किमतीत प्रति लीटर तब्बल 10 रुपयांची वाढ झाली आहे.
  • देखभालीचा वाढता खर्च: गाड्यांचे टायर, बॅटरी आणि इतर सुटे भाग (स्पेअर पार्ट्स) प्रचंड महाग झाले आहेत.
  • युरो-६ गाड्यांचा अतिरिक्त खर्च: नवीन युरो-6 नियमांच्या बसेसमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘ॲडब्लू’ या रसायनाची किंमतही लक्षणीय वाढली आहे.

या सर्व वाढत्या परिचालन खर्चामुळे भाडेवाढ करणे हाच एकमेव पर्याय बस चालकांसमोर उरला होता, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.

हे देखील वाचा – IPL 2026 Final: किंग कोहली vs प्रिन्स गिल! RCB रचणार इतिहास की GT मारणार बाजी? कधी व कुठे पाहता येईल फायनल? वाचा

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या