Home / महाराष्ट्र / Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंचे मध्यरात्री उपोषण मागे; सरकारकडून मागण्या मान्य, नेमका तोडगा काय निघाला?

Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंचे मध्यरात्री उपोषण मागे; सरकारकडून मागण्या मान्य, नेमका तोडगा काय निघाला?

Manoj Jarange Patil Protest: मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणावर बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल मध्यरात्री अखेर आपले...

By: Team Navakal
Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंचे मध्यरात्री उपोषण मागे; सरकारकडून मागण्या मान्य, नेमका तोडगा काय निघाला?
Social + WhatsApp CTA

Manoj Jarange Patil Protest: मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणावर बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल मध्यरात्री अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. रात्रीच्या वेळी मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.

अभ्यासकांनी सुचवलेल्या सर्व महत्त्वाच्या दुरुस्त्या सरकारने मान्य केल्यानंतर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी रात्री 10:30 वाजता जरांगे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या यशस्वी चर्चेनंतर मध्यरात्री 1:15 वाजता जरांगे पाटील यांनी पाणी पिऊन आंदोलन तात्पुरते मागे घेण्याची घोषणा केली.

Manoj Jarange Patil Protest: सरकारने मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या केल्या मान्य?

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या खालील महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक पावले उचलण्याचे मान्य केले आहे:

  • ५८ लाख नोंदींचा दस्तावेज: शोधण्यात आलेल्या 58 लाख कुणबी नोंदींचे दस्तावेज जरांगे यांच्याकडे सुपूर्द केले जातील आणि संबंधितांना कुणबी प्रमाणपत्रे दिली जातील.
  • हेल्पलाईन आणि बैठका: जात पडताळणीच्या कामासाठी विभागीय आयुक्त येत्या 15 दिवसांत विशेष बैठक घेतील. तसेच प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे-पाटील यांच्या स्तरावर स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली जाईल.
  • समितीला मुदतवाढ: न्यायमूर्ती शिंदे समितीला आणखी 1 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली असून मंत्रालयात एक स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन केला जाईल.
  • सातारा गॅझेट: सातारा गॅझेटियरच्या कामासाठी सरकारला आणखी 1 महिन्याचा वेळ वाढवून देण्यात आला आहे.

Manoj Jarange Patil Protest: उपोषण सोडताना काय म्हणाले मनोज जरांगे?

उपोषण मागे घेताना मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले की, “राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणलेल्या मसुद्यावर आम्ही आमच्या अभ्यासकांसोबत चर्चा केली. अभ्यासकांच्या सहमतीनंतरच हा निर्णय झाला आहे. हैदराबाद गॅझेटिअरनुसार प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती (SOP) अभ्यासकांना मान्य आहे.”

पुढे बोलताना त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला की, जर 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र दिले गेले नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाईची तरतूद करावी लागेल. तसेच, ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले आहे, त्यांना तात्काळ वैधता प्रमाणपत्र (व्हॉलिडिटी) देण्यात यावे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

Manoj Jarange Patil Protest: आंदोलक कुटुंबियांना १५ दिवसांत मदत

आरक्षण आंदोलनादरम्यान ज्या बांधवांनी आपले बलिदान दिले आहे, त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि नोकरी देण्याबाबतही चर्चा झाली.

“बलिदान देणाऱ्या आंदोलकांच्या कुटुंबियांना येत्या 15 दिवसांत आर्थिक सहाय्य केले जाईल, तसेच त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी, अशी आमची मागणी असून त्यावर काम सुरू आहे,” असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

संभाषणादरम्यान त्यांनी भाजपमधील काही मंत्र्यांवर टीका केली, तर मंत्री संजय शिरसाट हे अधिकाऱ्यांना ताणून धरत तात्काळ कामे करत असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारूनच निर्णय घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

हे देखील वाचा – Abhishek Banerjee Attacked: “शासकच बनले मारेकरी!”; पुतण्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ममता बॅनर्जींचा भाजप सरकारवर हल्लाबोल

Web Title:
संबंधित बातम्या