Home / महाराष्ट्र / Maharashtra MLC Election 2026: विधान परिषदेसाठी भाजपची 11 उमेदवारांची यादी जाहीर; सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याह्यांसह प्राजक्त तनपुरेंना संधी

Maharashtra MLC Election 2026: विधान परिषदेसाठी भाजपची 11 उमेदवारांची यादी जाहीर; सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याह्यांसह प्राजक्त तनपुरेंना संधी

Maharashtra MLC Election 2026: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता...

By: Team Navakal
Maharashtra MLC Election 2026: विधान परिषदेसाठी भाजपची 11 उमेदवारांची यादी जाहीर; सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याह्यांसह प्राजक्त तनपुरेंना संधी
Social + WhatsApp CTA

Maharashtra MLC Election 2026: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या 11 उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने या नावांवर शिक्कामोर्तब केले असून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या यादीमध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश या सर्वच विभागांतील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधील वजनदार नेत्यांना संधी देण्यात आली आहे.

Maharashtra MLC Election 2026: यादीतील दोन महत्त्वाची आणि चर्चेत असलेली नावे

या निवडणुकीच्या तिकिटांमध्ये दोन नावांची सर्वाधिक चर्चा रंगली आहे:

  • अरुण लखाणी (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली): खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचे लग्न ठरल्यामुळे त्यांचे होणारे सासरे अरुण लखानी गेल्या काही दिवसांपासून मीडियात चर्चेत होते. आता भाजपने त्यांना थेट विधान परिषदेच्या रिंगणात उतरवले आहे.
  • प्राजक्त तनपुरे (अहिल्यानगर): काही दिवसांपूर्वीच शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांना पक्षाने मोठे बक्षीस दिले आहे. राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे.

Maharashtra MLC Election 2026: भाजपच्या ११ उमेदवारांची संपूर्ण यादी

  • अहिल्यानगर: प्राजक्त तनपुरे
  • वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली: अरुण लखाणी
  • अमरावती: प्रवीण पोटे
  • सोलापूर: राजेंद्र राऊत
  • सांगली-सातारा: धैर्यशील कदम
  • संभाजीनगर-जालना: सुहास शिरसाट
  • नांदेड: अमर राजूरकर
  • धाराशिव-बीड-लातूर: बसवराज पाटील
  • जळगाव: नंदकिशोर महाजन
  • नागपूर: राजीव पोतदार

Maharashtra MLC Election 2026: महायुतीचे जागावाटप स्पष्ट; शिवसेना-राष्ट्रवादीच्या वाट्याला काय?

विधान परिषदेच्या एकूण 17 जागांसाठी महायुतीमधील जागावाटपाचे अंतिम सूत्र आता निश्चित झाले आहे. या फॉर्म्युल्यानुसार सर्वाधिक जागा भाजपच्या वाट्याला गेल्या आहेत.

  • भाजप (11 जागा): मुख्य जागांवर स्वतःचे उमेदवार उभे करत भाजपने आपला मोठा भाऊ असण्याचा दबदबा कायम ठेवला आहे.
  • शिवसेना (4 जागा): शिवसेनेचे नेते किमान ७ जागांसाठी आग्रही होते आणि ही चर्चा दिल्लीपर्यंत पोहोचली होती. मात्र, अखेर त्यांच्या पदरात ठाणे, नाशिक, परभणी आणि यवतमाळ अशा ४ जागा पडल्या आहेत.
  • राष्ट्रवादी काँग्रेस (2 जागा): सुरुवातीला केवळ १ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात असताना, अंतिम तडजोडीत राष्ट्रवादीला पुणे आणि कोकण अशा २ जागा मिळवण्यात यश आले आहे.

Maharashtra MLC Election 2026: असा असेल विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार या संपूर्ण प्रक्रियेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

अधिसूचना प्रसिद्धी: 25 मे

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत: 1 जून

अर्जांची छाननी: 2 जून

अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस: 4 जून

मतदान प्रक्रिया: 18 जून (सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत)

मतमोजणी आणि निकाल: 22 जून

हे देखील वाचा – IPL 2026 Price Money: विजेत्या RCB ला 20 कोटी, तर उपविजेत्या GT ला किती रक्कम मिळाली? पाहा

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या