Home / arthmitra / Best Government Schemes: फिक्स डिपॉझिट विसरा! ‘या’ 3 सरकारी योजनांमध्ये मिळतंय एफडीपेक्षा जास्त व्याज अन् टॅक्समधून सूट

Best Government Schemes: फिक्स डिपॉझिट विसरा! ‘या’ 3 सरकारी योजनांमध्ये मिळतंय एफडीपेक्षा जास्त व्याज अन् टॅक्समधून सूट

Best Government Schemes: स्वतःचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न असो किंवा निवृत्तीनंतरचे आयुष्य आरामात जगणे, प्रत्येकालाच सुरक्षित गुंतवणुकीची गरज असते. आजकाल...

By: Team Navakal
Best Government Schemes: फिक्स डिपॉझिट विसरा! 'या' 3 सरकारी योजनांमध्ये मिळतंय एफडीपेक्षा जास्त व्याज अन् टॅक्समधून सूट
Social + WhatsApp CTA

Best Government Schemes: स्वतःचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न असो किंवा निवृत्तीनंतरचे आयुष्य आरामात जगणे, प्रत्येकालाच सुरक्षित गुंतवणुकीची गरज असते. आजकाल अनेक जण जास्त नफ्यासाठी शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात पैसे लावतात. मात्र, ज्यांना आयुष्यात कोणताही धोका किंवा रिस्क नको आहे, अशा लोकांचा पहिला पसंतीचा पर्याय अजूनही बँकेची फिक्स डिपॉझिट (FD) हाच असतो.

पण तुम्हाला माहीत आहे का, की बाजारात अशा काही सरकारी बचत योजना उपलब्ध आहेत, जिथे बँकेच्या एफडीपेक्षा जास्त व्याज तर मिळतेच, सोबतच तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. केंद्र सरकारच्या या ३ सर्वोत्तम योजनांची माहिती खालीलप्रमाणे आहे, जिथे तुम्हाला बंपर व्याजासोबत टॅक्स बचतीचाही मोठा फायदा मिळेल.

1. नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (NSC)

नॅशनल सेविंग सर्टिफिकेट ही भारत सरकारची आणि पोस्ट ऑफिसची अत्यंत लोकप्रिय योजना आहे. सुरक्षित आणि हमखास उत्पन्नाचा मार्ग शोधणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

  • व्याजदर आणि कालावधी: या योजनेअंतर्गत सध्या वार्षिक 7.7% दराने व्याज दिले जात आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे.
  • गुंतवणुकीची मर्यादा: तुम्ही भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अवघ्या 1000 रुपयांपासून यामध्ये आपली गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये पैसे गुंतवण्याची कोणतीही कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही.

2. पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF)

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पीपीएफ हा सर्वसामान्य नोकरदार आणि व्यावसायिकांचा सर्वात लाडका पर्याय मानला जातो. या योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे याला सरकारी संरक्षणाची हमी असते.

  • व्याजदर आणि कालावधी: सध्या पीपीएफ खात्यावर वार्षिक 7.10% दराने व्याज मिळत आहे. ही योजना एकूण 15 वर्षांसाठी असते, जी भविष्यात वाढवताही येते.
  • टॅक्समध्ये मोठी सूट: या योजनेत तुम्ही वर्षाला किमान 500 रुपये ते कमाल 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. तसेच इन्कम टॅक्सच्या सेक्शन 80C अंतर्गत यावर टॅक्स सवलत मिळते.

3. सुकन्या समृद्धी योजना (SSY)

जर तुम्हाला तुमच्या लाडक्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी, तिच्या उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैशांचे नियोजन करायचे असेल, तर ही योजना सर्वोत्तम आहे. केंद्र सरकारने खास मुलींच्या सुरक्षिततेसाठी ही योजना सुरू केली आहे.

  • सर्वोच्च व्याजदर: सध्या या योजनेमध्ये सर्व सरकारी योजनांच्या तुलनेत सर्वात जास्त म्हणजेच तब्बल 8.20% दराने व्याज मिळत आहे.
  • गुंतवणुकीचे नियम: या खात्यात तुम्ही एका आर्थिक वर्षात किमान 250 रुपये ते कमाल 1.50 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता. या योजनेमध्येही सेक्शन 80C अंतर्गत पैशांवर पूर्ण टॅक्स सूट दिली जाते. मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्षी ही योजना मॅच्युअर होते.

बँकेच्या सामान्य एफडीमध्ये मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स कापला जातो, मात्र सरकारच्या या योजनांमध्ये सुरक्षिततेसोबतच टॅक्स वाचवण्याची सुवर्णसंधी मिळते. त्यामुळे जर तुम्हाला भविष्यासाठी मोठी रक्कम उभी करायची असेल, तर आजच जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन या योजनांचा लाभ घ्या.

हे देखील वाचा – West Bengal Political Crisis: बंगालमध्ये ‘ठाकरे-शिंदे’ पॅटर्नची पुनरावृत्ती? तृणमूलच्या 60 आमदारांच्या बंडामुळे ममता बॅनर्जी अडचणीत

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या