Home / देश-विदेश / West Bengal Political Crisis: बंगालमध्ये ‘ठाकरे-शिंदे’ पॅटर्नची पुनरावृत्ती? तृणमूलच्या 60 आमदारांच्या बंडामुळे ममता बॅनर्जी अडचणीत

West Bengal Political Crisis: बंगालमध्ये ‘ठाकरे-शिंदे’ पॅटर्नची पुनरावृत्ती? तृणमूलच्या 60 आमदारांच्या बंडामुळे ममता बॅनर्जी अडचणीत

West Bengal Political Crisis : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे अंतर्गत संकट निर्माण झाले आहे....

By: Team Navakal
West Bengal Political Crisis: बंगालमध्ये 'ठाकरे-शिंदे' पॅटर्नची पुनरावृत्ती? तृणमूलच्या 60 आमदारांच्या बंडामुळे ममता बॅनर्जी अडचणीत
Social + WhatsApp CTA

West Bengal Political Crisis : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे अंतर्गत संकट निर्माण झाले आहे. पहिल्यांदाच आमदार झालेले ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या ६० आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. हा गट आता मूळ पक्षावर आपला हक्क सांगत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विशेष मध्ये, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जसा राजकीय भूकंप घडवून आणला होता, तशीच ही परिस्थिती असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, ऋतब्रत बॅनर्जी हे शिंदे किंवा पवार यांच्यासारखे मोठे मास लीडर नसतानाही, त्यांनी अवघ्या काही या काही दिवसांत ६० आमदारांना आपल्या बाजूने कसे वळवले, याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

West Bengal Political Crisis : नेमका वाद काय आहे आणि बंड का झाले?

या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी पक्षांतर्गत असलेली नाराजी आणि संशयास्पद हालचाली आहेत:

  • बनावट स्वाक्षऱ्यांनंतर मोठी कारवाई: विरोधी पक्षनेते म्हणून सोभनदेव चट्टोपाध्याय यांच्या नावाचे पत्र राज्यपालांना देण्यात आले होते. या पत्रावर आमदारांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा यांनी केला. यानंतर ममता बॅनर्जी यांनी तातडीने या दोन्ही आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली.
  • ममता बॅनर्जींच्या बैठकीकडे पाठ: अंतर्गत धुसफूस किती वाढली होती हे यावरून स्पष्ट होते की, गेल्या आठवड्यात ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीला ८० पैकी तब्बल ६० आमदारांनी दांडी मारली होती. अगदी त्यांच्या नुकत्याच झालेल्या आंदोलनात केवळ ८ आमदार आणि ६ खासदार उपस्थित होते.

महाराष्ट्रातील बंड आणि बंगालमधील भूकंप यात काय फरक आहे?

राजकीय विश्लेषकांच्या मते, महाराष्ट्रात झालेली बंडखोरी आणि बंगालमधील सद्यस्थिती यात खूप मोठा फरक आहे:

  • वैचारिक अधिष्ठान विरुद्ध सत्तेची पकड: महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बंडाच्या मागे एक विशिष्ट राजकीय विचारसरणी किंवा आघाडी सरकारमधील अंतर्गत नाराजी होती. याउलट तृणमूल काँग्रेसची स्थापना काँग्रेसमधून वेगळे होऊन झाली असून, या पक्षाला कोणतीही ठराविक राजकीय विचारसरणी नाही. हा पक्ष विचारसरणीपेक्षा केवळ सत्तेच्या बळावर एकत्र राहिला आहे.
  • ममता बॅनर्जींचे नेतृत्व अजूनही मान्य: सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे, बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना ६० आमदारांच्या सह्यांचे पत्र देऊन ऋतब्रत यांना विरोधी पक्षनेते घोषित करण्याची मागणी केली असली, तरी त्यांनी ममता बॅनर्जींचे नेतृत्व नाकारलेले नाही. “आम्ही पक्ष सोडत नाही आहोत, आम्ही तृणमूलच्या झेंड्याखालीच काम करू,” असे बंडखोर नेत्यांचे म्हणणे आहे.

नाराजीचा मुख्य रोख अभिषेक बॅनर्जींवर!

पक्षातील या मोठ्या बंडाच्या मागे ममता बॅनर्जी यांच्यापेक्षा त्यांचे पुतणे आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याबद्दलचा राग कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

अनेक जुन्या नेत्यांचा आरोप आहे की, अभिषेक बॅनर्जी यांनी एका खाजगी राजकीय सल्लागार कंपनीच्या मदतीने पक्षाचा कारभार चालवण्यास सुरुवात केली होती. यामुळे ममता बॅनर्जींचे पक्षावरील नियंत्रण कमी झाले आणि आमदारांची कोंडी होऊ लागली. अभिषेक बॅनर्जी यांना तळागाळातील लोकांचा पाठिंबा नसल्याने नेत्यांमधील असंतोष थेट बंडाच्या रूपात बाहेर आला.

आता या संपूर्ण खेळात चेंडू ममता बॅनर्जी यांच्या कोर्टात आहे. त्या आपले पुतणे अभिषेक बॅनर्जी यांची बाजू घेतात की ६० बंडखोर आमदारांच्या गटाचे ऐकतात, यावर बंगालच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या
Cockroach Janata Party

Cockroach Janata Party : ६ जून रोजी सकाळी ८ वाजता दिल्ली विमानतळावर येणार अभिजित दिपके;आम्ही देशाचा ‘राजा’ नाही, तर जनतेचा ‘कर्मचारी’ निवडलाय!”; कॉकरोच जनता पार्टीचा धर्मेंद्र प्रधान यांच्यावर थेट हल्ला!