Home / क्रीडा / Lionel Messi Passport Leak: फिफा विश्वचषकात खळबळ! लिओनेल मेस्सीसह अर्जेंटिनाच्या सर्व खेळाडूंचा पासपोर्ट डेटा लीक

Lionel Messi Passport Leak: फिफा विश्वचषकात खळबळ! लिओनेल मेस्सीसह अर्जेंटिनाच्या सर्व खेळाडूंचा पासपोर्ट डेटा लीक

Lionel Messi Passport Leak: फुटबॉल विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या फिफा विश्वचषक २०२६ च्या सुरुवातीलाच एक धक्कादायक प्रकार समोर आला...

By: Team Navakal
Lionel Messi Passport Leak: फिफा विश्वचषकात खळबळ! लिओनेल मेस्सीसह अर्जेंटिनाच्या सर्व खेळाडूंचा पासपोर्ट डेटा लीक
Social + WhatsApp CTA

Lionel Messi Passport Leak: फुटबॉल विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या फिफा विश्वचषक २०२६ च्या सुरुवातीलाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सी आणि त्याच्या सहकाऱ्यांची अत्यंत संवेदनशील वैयक्तिक माहिती सार्वजनिक झाली आहे. एका सुरक्षा त्रुटीमुळे अर्जेंटिनाच्या संपूर्ण फुटबॉल संघाच्या पासपोर्टचे तपशील लीक झाल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

आइसलँडविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यापूर्वी अधिकृत टीम शीटवर सर्व खेळाडूंचे पासपोर्ट क्रमांक लिहिलेले होते. नियमानुसार प्रसारमाध्यमे आणि जनतेसाठी ही टीम शीट जारी करण्यापूर्वी ते क्रमांक अस्पष्ट (ब्लर) करणे आवश्यक होते. मात्र, अलाबामा येथील जॉर्डन-हेअर स्टेडियमवर ही माहिती कोणतीही गोपनीयता न बाळगता थेट सर्वत्र फिरवली गेली.

याउलट, आइसलँडच्या खेळाडूंनी टीम शीटवर आपले पासपोर्ट क्रमांक दिले नसल्यामुळे त्यांची माहिती सुरक्षित राहिली आहे. या प्रकरणावर आता फिफा आणि अर्जेंटिना फुटबॉल फेडरेशनकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

विशोष तपासणी आणि रेफरीला एन्ट्री नाकारल्याने वाद

यंदाचा विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच एकापाठोपाठ एक वाद समोर येत आहेत. पासपोर्ट लीक प्रकरणाव्यतिरिक्त इतर दोन मोठ्या घटनांमुळे स्पर्धा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे:

  • सेनेगल संघाची विमानतळावर झाडाझडती: सेनेगल फुटबॉल संघातील सादियो माने आणि कालिडू कुलीबाली यांसारख्या स्टार खेळाडूंची सॅन अँटोनियो विमानतळावर धावपट्टीवरच मेटल डिटेक्टरने तपासणी करण्यात आली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. स्पेनसारख्या इतर देशांच्या संघांना अशी वागणूक दिली गेली नाही, मग सेनेगल आणि उझबेकिस्तानच्या खेळाडूंचीच अशी तपासणी का झाली, असा सवाल नेटकरी विचारत आहेत.
  • सोमालियाच्या रेफरीला प्रवेश नाकारला: फिफाच्या अंतिम यादीत स्थान मिळवणारे सोमालियाचे पहिले रेफरी ओमर अरतान यांना अमेरिकेने मियामी विमानतळावर प्रवेश नाकारला. सुरक्षेच्या कारणास्तव (व्हेटिंग कन्सर्न्स) हा निर्णय घेतल्याचे अमेरिकेने सांगितले, परंतु सविस्तर कारण दिले नाही. यामुळे फिफाने त्यांना रेफरीच्या यादीतून बाहेर केले असून ते मायदेशी मोगादिशू येथे परतले आहेत. अरतान हे २०२५ मधील आफ्रिकेतील सर्वोत्तम पुरुष रेफरी ठरले होते.

मैदानावरील कामगिरी: मेस्सीचा ऐतिहासिक विक्रम

सुरक्षेच्या या सर्व गोंधळादरम्यान मैदानात मात्र अर्जेंटिनाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. ८८,००० पेक्षा जास्त प्रेक्षकांच्या उपस्थितीत अर्जेंटिनाने आइसलँडचा ३-० असा एकतर्फी पराभव केला.

या सामन्याची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • दुखापतीनंतर पुनरागमन: पायाच्या दुखापतीतून (हॅमस्ट्रिंग) बरा झाल्यानंतर मेस्सी उत्तरार्धात मैदानात उतरला आणि आल्या आल्या अवघ्या २ मिनिटांत त्याने खेळ बदलला.
  • पेनल्टीवर गोल: मेस्सीच्या पासवर लाऊतारो मार्टिनेझला डी-बॉक्समध्ये पाडण्यात आले. त्यानंतर मिळालेल्या पेनल्टीवर मेस्सीने शांतपणे गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
  • सर्वात वयस्कर गोलंदाज: या गोलसह मेस्सी ३८ वर्षे आणि ११ महिने वयाचा झाला असून तो अर्जेंटिनाकडून गोल करणारा इतिहासातील सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. त्याने १९५७ पासून अंझेल लाब्रूना यांच्या नावावर असलेला जुना विक्रम मोडला.

आता अर्जेंटिनाचा संघ आपल्या विजेतेपदाचा बचाव करण्यासाठी मंगळवारी अल्जेरियाविरुद्ध ग्रुप जे मधील आपल्या पहिल्या अधिकृत सामन्यात मैदानात उतरेल.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या