Home / महाराष्ट्र / Eknath Shinde : शिंदे दिल्लीहून थेट दरे गावी दोन दिवस मुक्काम करणार

Eknath Shinde : शिंदे दिल्लीहून थेट दरे गावी दोन दिवस मुक्काम करणार

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौरा आटोपल्यानंतर थेट सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील त्यांच्या मूळ दरे गावी आले...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

 Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौरा आटोपल्यानंतर थेट सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील त्यांच्या मूळ दरे गावी आले आहेत. मध्यरात्री साधारण अडीच वाजताच्या सुमारास ते दरेगावातील निवासस्थानी दाखल झाले. त्यांच्या या अचानक दौर्‍यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


पुढील दोन दिवस ते येथे मुक्काम करणार असून, हा दौरा खासगी स्वरूपाचा असल्याचे सांगितले जात आहे. या मुक्कामादरम्यान शिंदे दरे आणि परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेणार आहेत. विशेषतः रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधा तसेच पर्यटन विकासाशी संबंधित प्रकल्पांची पाहणी ते स्वतः करणार असल्याची माहिती आहे.  


दरे आणि आसपासच्या भागात समूह शेती आणि जागतिक दर्जाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनातर्फे विविध प्रकल्प राबवले जात आहेत. या कामांच्या प्रगतीची पाहणीही शिंदे करणार असल्याचे बोलले जात आहे. आपल्या  दौर्‍यात ते नेहमीप्रमाणे स्थानिक ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत. या दौर्‍यातून स्थानिक प्रशासकीय अधिकारीही दरे गावात उपस्थित राहणार आहेत.


राज्यात 18 जूनला होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घडत असताना शिंदेंचा हा दौरा होत असल्याने त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. शिंदे जेव्हा नाराज असतात, तेव्हा त्यांच्या दरे गावी जातात, असे आतापर्यंत अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे आताही शिंदे कुठल्या कारणावरून नाराज आहेत का, अशी कुजबूज
सुरू आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या