Home / मनोरंजन / Prasad Vedpathak : बिल्डिंगमधील जैन बांधवांशी पंगा घेणं प्रसाद वेदपाठकला चांगलंच नडलं!; पांढरी पट्टी हटवताच इन्स्टा अकाऊंट उडवलं, आता भाजप नेत्यांनीही घेरलं!”

Prasad Vedpathak : बिल्डिंगमधील जैन बांधवांशी पंगा घेणं प्रसाद वेदपाठकला चांगलंच नडलं!; पांढरी पट्टी हटवताच इन्स्टा अकाऊंट उडवलं, आता भाजप नेत्यांनीही घेरलं!”

Prasad Vedpathak : मुंबईतील घाटकोपर येथील एका गृहनिर्माण सोसायटीच्या आवारातील ‘पांढऱ्या पट्टी’वरून निर्माण झालेला वाद आता अधिकच चिघळला आहे. प्रसिद्ध...

By: Team Navakal
Prasad Vedpathak
Social + WhatsApp CTA

Prasad Vedpathak : मुंबईतील घाटकोपर येथील एका गृहनिर्माण सोसायटीच्या आवारातील ‘पांढऱ्या पट्टी’वरून निर्माण झालेला वाद आता अधिकच चिघळला आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक याने हा वाद सोडवल्याचा दावा केला असला, तरी आता त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणात आता राजकीय आणि सामाजिक वळण आले असून, जैन समाज आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी नगरसेवक प्रवीण छेडा प्रसाद वेदपाठकविरोधात आक्रमक झाले आहेत. वेदपाठक याने दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप करत छेडा यांनी पोलिसात धाव घेतली आहे.

वादाची पार्श्वभूमी आणि प्रसाद वेदपाठकचा आक्षेप-
काही दिवसांपूर्वी घाटकोपर येथील एका सोसायटीत राहणाऱ्या जैन कुटुंबाने जैन साध्वींच्या सुलभ आणि सुरक्षित प्रवासासाठी इमारतीच्या आवारात एक पांढरी पट्टी (लाईन) आखली होती. या पांढऱ्या पट्टीवर युट्यूबर प्रसाद वेदपाठक याने जाहीर आक्षेप घेतला होता. स्वतः राहत असलेल्या सोसायटीत अशा प्रकारे पट्टी मारल्यामुळे आपल्यासह आपली पत्नी आणि आई यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा प्रसादने सोशल मीडियाद्वारे केला होता.

त्यानंतर काही दिवसांनी ही पांढरी पट्टी तिथून हटवण्यात आली. पट्टी हटवल्यानंतर प्रसादने सोशल मीडियावर “माझ्यासाठी हा प्रश्न आता संपला आहे,” असे लिहीत तो व्हिडिओ शेअर केला. मात्र, प्रसादने हा विषय संपल्याचे जाहीर केले असले, तरी त्याच्या एका जुन्या विधानामुळे जैन समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

‘जैन जिहाद’ उल्लेखावरून भाजप नगरसेवक आक्रमक-
प्रसाद वेदपाठक याने या वादादरम्यान केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ‘जैन जिहाद’ आणि ‘आय एम अ व्हिक्टिम ऑफ जैन कम्युनिटी’ (मी जैन समाजाचा बळी ठरत आहे) अशा आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जैन समाजाला ‘जिहादी’ म्हणून संबोधित केल्यामुळे संतप्त झालेले भाजपचे माजी नगरसेवक प्रवीण छेडा यांनी थेट पोलीस उपायुक्तांची (डीसीपी, पूर्व विभाग – २) भेट घेतली. छेडा यांनी प्रसाद वेदपाठक विरोधात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी कठोर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

माध्यमांशी बोलताना प्रवीण छेडा म्हणाले, “प्रसाद वेदपाठकने केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आणि सोशल मीडियावरील ‘इन्फ्लुएन्स’ (चाहते) वाढवण्यासाठी मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात दोन धर्मांमध्ये विष पेरण्याचे काम केले आहे. जैन धर्म हा केवळ गुजराती किंवा मारवाडी लोकांपुरता मर्यादित नाही, तर अनेक मराठी आणि शिख बांधवही या धर्माचे पालन करतात. हा माणूस हिंदू संस्कृतीच्या विरोधात काम करत असून, धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या अशा व्यक्तीवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.”

प्रवीण छेडा यांची फेसबुक पोस्ट आणि पोलिसांकडे मागणी-
प्रवीण छेडा यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरूनही या संदर्भातील एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. “एकतेसाठी एकत्र या: घाटकोपरमधील शांतता भंग करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल,” अशा शीर्षकाखाली त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

त्यांनी लिहिले की, “घाटकोपर हे नेहमीच शांततापूर्ण सहजीवनाचे आणि सलोख्याचे प्रतीक राहिले आहे. परंतु, अलीकडच्या काळात जातीय तणाव निर्माण करू पाहणाऱ्या समाजकंटकांना आळा घालणे आवश्यक आहे. अनवाणी चालणाऱ्या जैन साधूंच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यांचा जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ लावून, त्याला ‘जैन जिहाद’ असे आक्षेपार्ह नाव देण्यात आले. अशा द्वेषयुक्त भाषणाला आपल्या समाजात स्थान नाही.” मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ कायदेशीर पावले उचलावीत, अशी विनंती त्यांनी केली आहे.

प्रसाद वेदपाठकचे इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड-
या संपूर्ण वादाचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले आहेत. जैन धर्मीय आक्रमक झाल्यानंतर प्रसाद वेदपाठक याने दावा केला होता की, काही लोक संघटितपणे (मास रिपोर्टिंग करून) त्याचे सोशल मीडिया अकाऊंट बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अखेर, या वादाचा परिणाम म्हणून प्रसाद वेदपाठकचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड (निलंबित) करण्यात आले आहे. अकाऊंट सस्पेंड झाल्याचा स्क्रीनशॉट त्याने एक्सवर सुद्दा शेयर केला आहे.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या