Home / लेख / Best Electric Scooters : इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायचीये? भारतात सर्वाधिक रेंज देणाऱ्या 5 बजेट गाड्यांची यादी पाहा

Best Electric Scooters : इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायचीये? भारतात सर्वाधिक रेंज देणाऱ्या 5 बजेट गाड्यांची यादी पाहा

Best Electric Scooters : भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी कमालीची वाढली आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहक आता...

By: Team Navakal
Best Electric Scooters : इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायचीये? भारतात सर्वाधिक रेंज देणाऱ्या 5 बजेट गाड्यांची यादी पाहा
Social + WhatsApp CTA

Best Electric Scooters : भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी कमालीची वाढली आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहक आता इलेक्ट्रिक स्कूटरकडे वळत आहेत. मात्र, ईव्ही खरेदी करताना ग्राहकांना नेहमी एकच चिंता सतावते, ती म्हणजे ‘गाडी एका चार्जमध्ये किती अंतर धावणार?’

ग्राहकांची हीच अडचण दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशा ५ दमदार इलेक्ट्रिक स्कूटर्सची माहिती देणार आहोत, ज्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सर्वोत्तम मानल्या जातात.

१. Hero Vida Range: पोर्टेबल चार्जिंगची सोय

हिरो मोटोकॉर्पच्या या श्रेणीमध्ये अतिशय स्टायलिश मॉडेल्सचा समावेश आहे. तरुण पिढीला आकर्षित करेल असे याचे डिझाईन आहे.

  • खास वैशिष्ट्य: यामध्ये बॅटरी काढून घरी किंवा ऑफिसमध्ये सहज चार्ज करण्याची सोय मिळते, जी रोजच्या धावपळीत अत्यंत सोयीची ठरते.
  • रेंज आणि किंमत: ही स्कूटर एका चार्जमध्ये 92 किलोमीटर ते 165 किलोमीटरपर्यंत धावते. याची किंमत फक्त 77,950 रुपयांपासून सुरू होते.

२. Bajaj Chetak C2501: मजबूत मेटल बॉडी आणि प्रीमियम लुक

बजाज चेतक हे भारतीय ग्राहकांचे अत्यंत लाडके आणि जुने नाव आहे. याच्या नवीन जनरेशन मॉडेलला बाजारात खूप चांगली मागणी आहे.

  • इंजिन आणि रचना: यात पूर्ण मेटल बॉडी मिळते, ज्यामुळे गाडीला कमालीची मजबूती आणि आकर्षक लुक मिळतो. यात 2.5kWh चा बॅटरी पॅक आणि 2.2kW ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे.
  • रेंज आणि किंमत: एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर 113 किलोमीटरपर्यंत धावते. याची सुरुवातीची किंमत 96,504 रुपयांपासून आहे.

३. TVS iQube: सर्वाधिक विश्वासू आणि लोकप्रिय पर्याय

भारतीय बाजारपेठेत टीव्हीएस कंपनीची ही स्कूटर आपल्या परफॉर्मन्समुळे अत्यंत विश्वासार्ह मानली जाते. ग्राहकांसाठी ही गाडी वेगवेगळ्या तीन व्हेरिएंट्समध्ये येते.

  • रेंज: यामध्ये बसवण्यात आलेल्या प्रगत बॅटरी पॅकनुसार, ही स्कूटर एका चार्जमध्ये 94 किलोमीटरपासून थेट 212 किलोमीटरपर्यंतची शानदार रेंज देते.
  • किंमत: या स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 93,786 रुपये आहे.

४. Suzuki E Access: प्रगत बॅटरी आणि दमदार परफॉर्मन्स

सुझुकीची ही स्कूटर आपल्या उत्कृष्ट बिल्ड कॉलिटीसाठी आणि वेगवान पिकअपसाठी ओळखली जाते. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

  • बॅटरी आणि टॉर्क: यात 3.07kWh क्षमतेची लिथियम आयरन फॉस्फेट बॅटरी आणि 4.1kWh ची इलेक्ट्रिक मोटर आहे, जी 15nm का टॉर्क जनरेट करते.
  • रेंज आणि किंमत: ही गाडी एका चार्जमध्ये 95 किलोमीटरची रेंज देते. या स्कूटरची किंमत 1,88,490 रुपयांपासून सुरू होते.

५. Ather Rizta: खास कुटुंबासाठी डिझाईन केलेली स्कूटर

अथर कंपनीने ही स्कूटर विशेषतः कौटुंबिक गरजा आणि सामानाची ने-आण करण्याचा विचार करून तयार केली आहे. आरामदायी मोठी सीट हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

  • किंमत: या फॅमिली स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.04 लाख रुपयांपासून सुरू होते.
  • रेंज: एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 123 किलोमीटर ते 159 किलोमीटरपर्यंत विनाखंड धावू शकते.

हे देखील वाचा – ODI World Cup 2027: क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली! वन-डे विश्वचषक 2027 च्या तारखा जाहीर; 14 संघांमध्ये रंगणार महामुकाबला

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या