Home / लेख / Hisense E8S Mini LED TV: थिएटरचा फील आता घरात! Hisenseने लाँच केला दमदार मिनी एलईडी स्मार्ट टीव्ही; पाहा किंमत

Hisense E8S Mini LED TV: थिएटरचा फील आता घरात! Hisenseने लाँच केला दमदार मिनी एलईडी स्मार्ट टीव्ही; पाहा किंमत

Hisense E8S Mini LED TV: घरबसल्या चित्रपट, खेळ आणि गेमिंगचा अद्भूत आनंद घेऊ इच्छिणाऱ्या युजर्ससाठी शानदार टीव्ही बाजारात आला आहे....

By: Team Navakal
Hisense E8S Mini LED TV: थिएटरचा फील आता घरात! Hisenseने लाँच केला दमदार मिनी एलईडी स्मार्ट टीव्ही; पाहा किंमत
Social + WhatsApp CTA

Hisense E8S Mini LED TV: घरबसल्या चित्रपट, खेळ आणि गेमिंगचा अद्भूत आनंद घेऊ इच्छिणाऱ्या युजर्ससाठी शानदार टीव्ही बाजारात आला आहे. प्रसिद्ध टेक ब्रँड हायसेन्सने भारतात आपली अत्यंत प्रगत आणि प्रीमियम अशी ‘Hisense E8S Mini LED TV’ मालिका अधिकृतपणे लाँच केली आहे.

हा टीव्ही खासकरून अशा ग्राहकांसाठी तयार करण्यात आला आहे, ज्यांना मोठ्या स्क्रीनवर उत्कृष्ट दर्जाचे विजुअल्स पाहायचे आहेत.

या स्मार्ट टीव्हीमध्ये वापरण्यात आलेले मिनी एलईडी डिस्प्ले तंत्रज्ञान स्क्रीनवरील रंगांना जिवंत करते. यामध्ये हजारो लहान एलईडी बॅकलाईट्सचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे स्क्रीनवर कडक ब्राइटनेस आणि अचूक कॉन्ट्रास्ट मिळतो. परिणामी, अंधारातील सीन अधिक गडद आणि उजेडातील सीन अत्यंत स्पष्ट दिसतात.

Hisense E8S Mini LED TV: पाहा किती आहे किंमत आणि कुठे मिळणार?

प्रीमियम फीचर्सने सज्ज असलेल्या या टीव्ही सीरिजची किंमत ग्राहकांच्या बजेटचा विचार करून निश्चित करण्यात आली आहे:

  • शुरुआती किंमत: या सीरिजमधील 55 इंचाच्या बेस मॉडेलची किंमत 57,990 रुपये ठेवण्यात आली आहे.
  • विविध साईजमध्ये उपलब्ध: या लाईनअपमध्ये ग्राहकांसाठी 55 इंचासोबतच 65 इंच, 75 इंच आणि तब्बल 85 इंचाच्या मोठ्या स्क्रीनचे मॉडेल्स देखील सादर करण्यात आले आहेत.
  • ऑफर्सची रेलचेल: हा टीव्ही अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल. ग्राहकांसाठी १८ महिन्यांपर्यंतची नो-कॉस्ट ईएमआय आणि कडक डिस्काउंट ऑफर्स देखील दिल्या जात आहेत.

Hisense E8S Mini LED TV: गेमिंग आणि पिक्चर क्वालिटीसाठी जबरदस्त स्पेसिफिकेशन्स

हायसेन्सने या टीव्हीमध्ये केवळ उत्तम डिस्प्लेच दिला नाही, तर अंतर्गत सिस्टीम देखील अत्यंत पॉवरफुल ठेवली आहे:

  • स्मूद गेमिंग अनुभव: हा टीव्ही 144Hz च्या नेटिव्ह रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यामुळे प्लेस्टेशन किंवा एक्सबॉक्स सारखे नेक्स्ट-जेन कन्सोल वापरणाऱ्या गेमर्सना वेगवान गेम खेळताना स्क्रीन अजिबात लॅग किंवा ब्लर न होता उत्तम अनुभव मिळेल.
  • एआय इंजिनची ताकद: स्क्रीनवरील चित्राचा दर्जा रीअल टाइममध्ये सुधारण्यासाठी यात ‘हाय-व्ह्यू एआय इंजिन’ दिले आहे. तर या मालिकेतील सर्वात मोठ्या 85 इंचाच्या मॉडेलमध्ये अधिक शार्प विजुअल्ससाठी ‘हाय-व्ह्यू एआय इंजिन प्रो’ चा वापर करण्यात आला आहे.
  • नॅचरल कलर्स: यात हाय-क्यूएलईडी रंगांचा सपोर्ट आहे, ज्यामुळे क्रिकेट मॅच किंवा चित्रपट पाहताना रंग अगदी नैसर्गिक आणि चमकदार दिसतात.

Hisense E8S Mini LED TV: साउंडबारची गरजच पडणार नाही; असा आहे ऑडिओ सेटअप

नेहमीच्या टीव्हीमध्ये चांगल्या आवाजासाठी वेगळा साउंडबार किंवा होम थिएटर लावावा लागतो. मात्र, Hisense E8S मध्ये ही कटकट पूर्णपणे संपणार आहे. या टीव्हीमध्ये Devialet या जगप्रसिद्ध ऑडिओ ब्रँडने ट्यून केलेला इन-बिल्ट सबवूफर दिला आहे. हा सबवूफर गाण्यांना आणि संवादांना कडक बेस देतो, ज्यामुळे चित्रपट पाहताना थिएटरसारखा आवाजाचा थरार घरबसल्या अनुभवता येतो.

हे देखील वाचा – Food Safety Alert: हॉटेलमध्ये गंजलेल्या चाकूंचा वापर केल्यास होणार कारवाई! FSSAI खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी नवा नियम

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या