India Pakistan Water Dispute: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंध कमालीचे ताणलेले असतानाच, आता पाकिस्तानातून युद्धाची थेट धमकी देण्यात आली आहे. जर आमच्या देशाची जल सुरक्षा धोक्यात आली, तर इस्लामाबाद भारतावर लष्करी हल्ला करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे वक्तव्य पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांनी भारताला उघड इशारा दिला आहे. आमच्या देशाची राष्ट्रीय सुरक्षा आणि पाणी हे दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. जर भारताने आमचे पाणी अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे ठोस पुरावे आमच्या हाती लागले, तर आम्ही निश्चितपणे भारताच्या विरोधात युद्ध छेडू, असे आसिफ यांनी म्हटले आहे. पाकिस्तान सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करत असतानाच हा नवा वाद समोर आला आहे.
India Pakistan Water Dispute: भारताच्या ‘या’ निर्णयामुळे पाकिस्तानची फाटली गाळ; जून २०२८ ची डेडलाईन
पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे हे चिथावणीखोर वक्तव्य भारताच्या केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांच्या एका दाव्यानंतर आले आहे. भारताकडून पाकिस्तानला जाणारे सिंधू नदीचे पाणी पूर्णपणे रोखण्यासाठी मोठी पावले उचलली जात आहेत:
- जून २०२८ पर्यंत पाणी रोखणार: भारताचे जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी नुकतेच स्पष्ट केले होते की, जून 2028 पर्यंत पाकिस्तानच्या दिशेने वाहणारे सिंधू नदीचे पाणी पूर्णपणे रोखले जाऊ शकते.
- दहशतवादी हल्ल्यानंतर कारवाई: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हे कठोर पाऊल उचलले आहे. या हल्ल्यामध्ये 26 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता, ज्याचे धागेदोरे पाकिस्तानात जोडले गेले होते.
- करार स्थगित: या सीमेपलीकडील दहशतवादाला चोख प्रत्युत्तर म्हणून भारताने वर्ष 1960 च्या ऐतिहासिक सिंधू जल कराराला तात्पुरती स्थगिती दिली आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांना निधी पुरवणे बंद करत नाही, तोपर्यंत हा निर्णय कायम राहणार आहे.
काय आहे सिंधू जल करार? ज्यावर अवलंबून आहे पाकिस्तान
जागतिक बँकेच्या मध्यस्थीने 1960 मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान हा ऐतिहासिक करार झाला होता. या कराराची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
या करारांतर्गत सिंधू नदी खोऱ्यातील तब्बल 80 टक्के पाणी पाकिस्तानला वापरण्यासाठी देण्यात आले आहे. पाकिस्तानमधील सुमारे 80 टक्के शेतजमीन केवळ याच पाण्याच्या जीवावर फुलते. त्यामुळे भारताने हा पाणीपुरवठा बंद केल्यास पाकिस्तान संपूर्णपणे वाळवंट बनेल आणि तिथे भुकेची वेळ येईल, अशी भीती पाकिस्तानला सतावत आहे. यामुळेच आता पाकिस्तानचे मंत्री युद्धाची भाषा करत भारताला धमकावण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
हे देखील वाचा – Sanjay Raut Target Rebels: “तुमच्या हिंमत असेल तर …”; बंडखोर खासदारांवर संजय राऊतांचा घणाघात










