Home / महाराष्ट्र / Mumbai Rain Updates: मुंबईत वरुणराजाचे जोरदार आगमन! उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

Mumbai Rain Updates: मुंबईत वरुणराजाचे जोरदार आगमन! उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

Mumbai Rain Updates: गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आजची सकाळ आल्हाददायक ठरली. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाने दमदार...

By: Team Navakal
Mumbai Rain Updates: मुंबईत वरुणराजाचे जोरदार आगमन! उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून 'ऑरेंज अलर्ट' जारी
Social + WhatsApp CTA

Mumbai Rain Updates: गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आजची सकाळ आल्हाददायक ठरली. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाने दमदार एन्ट्री केली आहे. यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे सुमारे 15 ते 17 दिवस लांबला होता.

मात्र, आज सकाळपासूनच दादर, वरळी, लोअर परळ या मध्य मुंबईच्या भागांसह अंधेरी, विलेपार्ले आणि वांद्रे या पश्चिम उपनगरांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामुळे मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मुंबईला आज ‘ऑरेंज अलर्ट’; पुढील दोन दिवस अंतर्गत महाराष्ट्रात जोर वाढणार

हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत:

  • मुंबईसाठी चेतावणी: आज मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
  • अंतर्गत भागात मुसळधार: पावसाची ही नवी प्रणाली हळूहळू उत्तरेच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे 24 ते 26 जून दरम्यान महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता आहे.
  • दक्षिण महाराष्ट्र सक्रिय: गेल्या दोन आठवड्यांपासून रेंगाळलेला मान्सून आता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यापर्यंत पुन्हा सक्रिय झाला असून अनेक भागांत हलका ते मुसळधार पाऊस नोंदवला गेला आहे.

कोकणात कोमेजणाऱ्या भातशेतीला आधार; हिंगोलीतही अनेक दिवसांनी हजेरी

मुंबईव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाने काही प्रमाणात दिलासा दिला आहे:

हिंगोली जिल्हा: हिंगोलीत वसमत शहरासह ग्रामीण भागात दीर्घ विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभराच्या उकाड्यापासून नागरिकांना सुटका मिळाली असली, तरी शेतकऱ्यांना अजूनही खरीप पेरण्यांसाठी दमदार आणि सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे. लवकरात लवकर चांगला पाऊस होऊन पेरण्या पूर्ण व्हाव्यात, अशी आशा शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे.

कोकण किनारपट्टी: सिंधुदुर्गात मान्सून दाखल झाल्यानंतर पावसाने दडी मारली होती. मात्र, काल कणकवली आणि कुडाळ परिसरामध्ये 15 ते 20 मिनिटे झालेल्या हलक्या पावसामुळे कोमेजू लागलेल्या भाताच्या रोपांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यातील इतर भागांतील बळीराजा अजूनही मोठ्या पावसाची वाट पाहत आहे.

हे देखील वाचा – Sanjay Raut Target Rebels: “तुमच्या हिंमत असेल तर …”; बंडखोर खासदारांवर संजय राऊतांचा घणाघात

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या