Home / महाराष्ट्र / PMC Water Crisis: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! महापालिकेचे कडक आदेश जारी, नियम मोडल्यास दंड

PMC Water Crisis: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! महापालिकेचे कडक आदेश जारी, नियम मोडल्यास दंड

PMC Water Crisis: पुणे शहरात यंदा मान्सून कमजोर राहण्याच्या शक्यतेमुळे आणि पाण्याच्या उपलब्धतेबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे पुणे महानगरपालिकेने (PMC) संपूर्ण...

By: Team Navakal
PMC Water Crisis: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! महापालिकेचे कडक आदेश जारी, नियम मोडल्यास दंड
Social + WhatsApp CTA

PMC Water Crisis: पुणे शहरात यंदा मान्सून कमजोर राहण्याच्या शक्यतेमुळे आणि पाण्याच्या उपलब्धतेबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे पुणे महानगरपालिकेने (PMC) संपूर्ण शहरात तातडीने कडक पाणी बचतीचे नियम लागू केले आहेत.

भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सूनबाबत वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असून ‘एल निनो’ स्थितीचा फटका बसू शकतो. या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने हे मोठे पाऊल उचलले आहे.

पाण्याचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी हे प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्यात आले आहेत. नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

शहरात ‘हे’ नवीन नियम तात्काळ लागू; जाणून घ्या काय बंद राहणार?

पुणे महानगरपालिकेने जाहीर केलेले कडक नियम खालीलप्रमाणे आहेत:

  • गाड्या धुण्यावर बंदी: शहरातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहन धुण्याची केंद्रे (वॉशिंग सेंटर) या पाणी बचत कालावधीत पूर्णपणे बंद ठेवावी लागतील. तसेच घरात किंवा रस्त्यावर नळ सोडून अथवा बोअरवेलच्या पाण्याने वाहने आणि अंगण धुण्यास सक्त मनाई आहे.
  • स्विमिंग पूल आणि बागांना ब्रेक: खाजगी आणि सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय घरातील खाजगी बागा किंवा लॉनसाठी पिण्याचे पाणी वापरता येणार नाही. पालिकेच्या स्वतःच्या उद्यानांनाही पिण्याचे पाणी न वापरण्याचे आदेश दिले आहेत.
  • बांधकामांसाठी नवीन नियम: कोणत्याही नवीन बांधकाम प्रकल्पासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करता येणार नाही. बांधकामांसाठी केवळ प्रक्रिया केलेले सांडपाणी (STP वॉटर), बोअरवेल किंवा विहिरीचे पाणी वापरणे बंधनकारक आहे.
  • गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सक्ती: मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी आपापल्या भागातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) कार्यान्वित ठेवणे आणि तेच पाणी फ्लशिंग व बागकामासाठी वापरणे गरजेचे आहे. तसेच पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होऊ नयेत म्हणून ऑटोमॅटिक फ्लोट व्हॉल्व्ह बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नियमांचे उल्लंघन केल्यास थेट १०,००० रुपयांचा दंड; पालिकेची मोठी मोहीम

पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे की, खालीलपैकी कोणत्याही कारणासाठी पाण्याचा अपव्यय करताना आढळल्यास थेट 10,000 रुपयांचा दंड वसूल केला जाईल:

१. बंदी असतानाही वाहन धुण्याची केंद्रे सुरू ठेवणे.

२. स्विमिंग पूलमध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर करणे.

३. खाजगी बागेसाठी पिण्याचे पाणी वापरणे.

४. इमारतीवरील पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊ देणे.

५. बांधकाम व्यवहारांसाठी पिण्याचे पाणी वापरणे.

६. पालिकेच्या अधिकृत टँकरमधून पाणी गळती होऊ देणे.

या नियमांसोबतच शहरात कुठेही बेकायदेशीर नळ जोडणी आढळल्यास त्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. जलवाहिन्या आणि टँकरमधील गळती तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पालिका कर्मचारी, आरोग्य निरीक्षक आणि क्षेत्रीय कर्मचारी फिरत्या वाहनांद्वारे व ध्वनिक्षेपकावरून शहरात मोठी मोहीम राबवणार आहेत.

हे देखील वाचा – Sanjay Raut Target Rebels: “तुमच्या हिंमत असेल तर …”; बंडखोर खासदारांवर संजय राऊतांचा घणाघात

Web Title:
संबंधित बातम्या
Narendra Darade

Narendra Darade : अधिकृत उमेदवाराचा गेम करत अपक्ष गोकुळ गीतेंचा अनपेक्षित विजय; नेत्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला!; पराभवानंतर नरेंद्र दराडेंच्या कन्येला मतमोजणी केंद्राबाहेर अश्रू अनावर, म्हणाल्या…