Home / लेख / Virat Kohli Test Comeback : पुन्हा टेस्ट खेळणार का? विराट कोहलीने स्वतःच केला निवृत्तीवरून मोठा खुलासा

Virat Kohli Test Comeback : पुन्हा टेस्ट खेळणार का? विराट कोहलीने स्वतःच केला निवृत्तीवरून मोठा खुलासा

Virat Kohli Test Comeback : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार अशा चर्चा...

By: Team Navakal
Virat Kohli Test Comeback : पुन्हा टेस्ट खेळणार का? विराट कोहलीने स्वतःच केला निवृत्तीवरून मोठा खुलासा
Social + WhatsApp CTA

Virat Kohli Test Comeback : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून क्रीडा जगतात रंगत होत्या. विराटने कसोटी निवृत्तीची घोषणा करून एक वर्ष पूर्ण झाले असतानाच या चर्चा सुरू झाल्या होत्या. याचे मुख्य कारण म्हणजे विराटने त्याचे लहानपणाचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना लाल रंगाची (रेड-बॉल थीम) शूजची जोडी भेट दिली होती.

त्यावर प्रतिक्रिया देताना राजकुमार शर्मा म्हणाले होते की, “कसोटी क्रिकेट तुझ्यासाठी का महत्त्वाचे होते, हे माझ्या नेहमीच लक्षात राहील.” त्यानंतर एका कार्यक्रमात त्यांनी “आम्ही यावर बोलत आहोत, पाहूया काय होते” असे म्हटल्यामुळे चाहत्यांच्या आशा वाढल्या होत्या.

तसेच रवी शास्त्री यांच्यासोबतच्या एका संभाषणात विराटने घातलेला स्वेटर पारंपरिक कसोटी कपड्यांसारखा दिसत असल्याने सोशल मीडियावर त्याच्या पुनरागमनाचे दावे केले जाऊ लागले. मात्र, या सर्व चर्चांना आणि तर्कवितर्कांना आता स्वतः विराटनेच पूर्णविराम दिला आहे.

९,२३0 धावसंख्या आणि नव्या शूजचे कनेक्शन; विराटने दिले स्पष्ट उत्तर

नवी दिल्लीत आयोजित ‘One8’ या त्याच्या स्वतःच्या ब्रँडच्या नवीन शूजच्या लॉन्चिंग कार्यक्रमात विराटने यावर जाहीरपणे भाष्य केले. या कार्यक्रमाचा सुत्रसंचालक डॅनिश सैत याने विराटला एक रंजक प्रश्न विचारला. विराटच्या नवीन ‘रेड शू’ची किंमत 9,230 रुपये ठेवण्यात आली आहे, जी विराटने कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या एकूण धावांइतकीच (9,230 धावा) आहे. हा आकडा कसोटीत परत येण्याचा काही छुपा इशारा आहे का? असा प्रश्न विचारला गेला.

यावर हसत उत्तर देत विराटने सर्व अफवा फेटाळून लावल्या. विराट म्हणाला, “नाही, नाही, मी या सर्वातून आता पूर्णपणे बाहेर पडलो आहे. माझे कसोटी क्रिकेट आता संपले आहे.” विराटच्या या एका विधानामुळे गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

कसोटीतील थक्क करणारी आकडेवारी आणि पुढील प्रवासाचे शेड्युल

विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा आलेख आणि सध्याची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

एकदिवसीय सामने आणि आगामी दौरा: विराट आता फक्त वनडे (ODI) क्रिकेट खेळत असून 2027 चा विश्वचषक हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय दौरा असण्याची शक्यता आहे. आयपीएल 2026 नंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत तो खेळणार होता, मात्र पायाच्या दुखापतीमुळे (हॅमस्ट्रिंग) त्याला विश्रांती घ्यावी लागली. आता इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात त्याची निवड झाली असून, फिटनेस चाचणीनंतर तो मैदानात उतरेल.

कसोटी कारकीर्द: विराटने मे 2025 मध्ये कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली होती. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 123 कसोटी सामने खेळताना 46.85 च्या सरासरीने 9,230 धावा केल्या आहेत. यामध्ये 30 शतके आणि 7 द्विशतकांचा समावेश आहे.

टी२० निवृत्ती: जून 2024 मध्ये बार्बाडोस येथे भारताने टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराटने या छोट्या फॉरमॅटला अलविदा केला होता.

हे देखील वाचा – Sanjay Raut Target Rebels: “तुमच्या हिंमत असेल तर …”; बंडखोर खासदारांवर संजय राऊतांचा घणाघात

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या