Home / महाराष्ट्र / Sanjay Raut : मिंधे सरकार बाळंत झाले असून त्यांनी एकाच वेळी ६ गद्दारांना जन्म दिलाय!; खासदार फुटल्यानंतर संजय राऊतांचा संताप अनावर..

Sanjay Raut : मिंधे सरकार बाळंत झाले असून त्यांनी एकाच वेळी ६ गद्दारांना जन्म दिलाय!; खासदार फुटल्यानंतर संजय राऊतांचा संताप अनावर..

Sanjay Raut : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या (UBT) सहा प्रमुख खासदारांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील...

By: Team Navakal
Sanjay Raut :
Social + WhatsApp CTA

Sanjay Raut : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या (UBT) सहा प्रमुख खासदारांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात प्रवेश केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा राजकीय धक्का ठाकरे गटाच्या चांगलाच जिव्हारी लागला असून, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांवर अत्यंत आक्रमक, जहरी आणि बोचऱ्या शब्दांत तोंडसूख घेतले आहे. पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर सातत्याने नामोल्लेख करून टीका करणाऱ्या राऊतांनी आता थेट वैद्यकीय उपमा देत सत्ताधाऱ्यांवर घणाघाती प्रहार केला आहे.

ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणारे ‘ते’ सहा खासदार-
१. खासदार संजय जाधव
२. खासदार संजय देशमुख
३. खासदार भाऊसाहेब वाकचौरे
४. खासदार संजय दिना पाटील
५. खासदार नागेश पाटील आष्टीकर
६. खासदार ओमराजे निंबाळकर

या सहाही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केल्यानंतर मुंबईत त्यांची भेट घेतली. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांचा संताप अनावर झाला. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी या पक्षांतराला ‘ऑपरेशन टायगर’ ऐवजी उपरोधिकपणे ‘बाळंतपण’ संबोधले. ते म्हणाले,

“सध्याचे मिंधे सरकार बाळंत झाले असून त्यांनी एकाच वेळी सहा गद्दारांना जन्म दिला आहे. त्यांचे हे ऑपरेशन वरकरणी यशस्वी झाले असले, तरी या बंडखोरांची राजकीय प्रकृती सुस्थितीत आहे असे समजू नका; भविष्यात त्यांचे ‘सिझरिंग’ (शस्त्रक्रिया) करावे लागेल.”

आपली टीका पुढे चालू ठेवत राऊतांनी आंतरराष्ट्रीय उदाहरणाचा दाखला दिला. ते म्हणाले की, केनियामध्ये एका महिलेने एकाच वेळी पाच अपत्यांना जन्म दिल्याचा जागतिक विक्रम ऐकिवात होता; मात्र महाराष्ट्रात या मिंधे गटाने एकाच वेळी सहा ‘गद्दार’ जन्माला घालण्याचा नवा राजकीय विक्रम प्रस्थापित केला आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या
Operation Tiger

Operation Tiger : मातोश्रीला पडलेल्या भगदाडावर एकनाथ शिंदेंची पहिली कडक प्रतिक्रिया!ते ६ टायगर शिवसेनेत आलेत, ना तुडवायला, ना आडवायला-आम्ही फक्त शिवसेना वाढवायला निघालोय’ म्हणत शिंदेनी टीकाकारांना सुनावले..