Home / देश-विदेश / UK Next Prime Minister: कोण आहेत ‘किंग ऑफ द नॉर्थ’ अँडी बर्नहॅम? जे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आहेत सर्वात पुढे

UK Next Prime Minister: कोण आहेत ‘किंग ऑफ द नॉर्थ’ अँडी बर्नहॅम? जे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आहेत सर्वात पुढे

UK Next Prime Minister: ब्रिटनच्या राजकारणात सध्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या प्रसिद्ध मालिकेसारखा राजकीय थरार पाहायला मिळत आहे. पंतप्रधान कीर...

By: Team Navakal
UK Next Prime Minister: कोण आहेत 'किंग ऑफ द नॉर्थ' अँडी बर्नहॅम? जे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आहेत सर्वात पुढे
Social + WhatsApp CTA

UK Next Prime Minister: ब्रिटनच्या राजकारणात सध्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या प्रसिद्ध मालिकेसारखा राजकीय थरार पाहायला मिळत आहे. पंतप्रधान कीर स्टारमर यांनी आपल्या पदाचा आणि लेबर पार्टीच्या मुख्य नेतेपदाचा राजीनामा देऊन सर्वांनाच धक्का दिला.

स्टारमर यांच्या एक्झिटनंतर आता ब्रिटनच्या पुढील पंतप्रधानपदाची धुरा कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या शर्यतीत सध्या ‘किंग ऑफ द नॉर्थ’ म्हणून ओळखले जाणारे लेबर पार्टीचे दिग्गज नेते अँडी बर्नहॅम यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे.

कीर स्टारमर यांच्या राजीनाम्यामुळे ब्रिटनमध्ये गेल्या अवघ्या १० वर्षांपेक्षा थोड्या जास्त कालावधीत ७ व्या वेळेस पंतप्रधान बदलला जाणार आहे. गेल्या जवळपास २०० वर्षांच्या इतिहासातील हा सर्वात मोठा नेतृत्वबदल मानला जात आहे. नुकत्याच झालेल्या मेकरफिल्ड पोटनिवडणुकीत विजय मिळवून संसदेत परतलेले ५६ वर्षांचे अँडी बर्नहॅम हे सध्या ब्रिटनच्या राजकारणातील सर्वात चर्चेतील चेहरा बनले आहेत.

कोण आहेत अँडी बर्नहॅम? ज्यांना म्हटले जाते ‘किंग ऑफ द नॉर्थ’

अँडी बर्नहॅम यांचा राजकीय प्रवास आणि त्यांना मिळालेल्या या खास नावामागचा इतिहास खालीलप्रमाणे आहे:

  • करिअरची सुरुवात: अँडी बर्नहॅम यांचा जन्म जानेवारी 1970 मध्ये ब्रिटनच्या मर्सीसाइड येथे झाला. त्यांनी 2001 ते 2017 या काळात ली मतदारसंघाचे खासदार म्हणून संसदेत प्रतिनिधित्व केले आहे. माजी पंतप्रधान गॉर्डन ब्राउन यांच्या सरकारमध्ये त्यांनी तिजोरीचे मुख्य सचिव, संस्कृती मंत्री आणि आरोग्य मंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
  • दोन वेळा अपयश: बर्नहॅम यांनी यापूर्वी 2015 आणि 2017 मध्ये लेबर पार्टीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती, मात्र दोन्ही वेळेस त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी लंडनचे राजकारण सोडून थेट मँचेस्टरचा रस्ता धरला.
  • नाव कसे पडले ‘किंग ऑफ द नॉर्थ’?: 2017 मध्ये ते पहिल्यांदा ग्रेटर मँचेस्टरचे थेट निवडून आलेले महापौर बनले. 2020 मधील कोरोना महामारीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या लॉकडाऊन धोरणांना आणि आर्थिक पॅकेजला बर्नहॅम यांनी कडाडून विरोध केला होता.
  • लंडनच्या तुलनेत उत्तरेकडील भागाला कमी निधी दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ब्रिटनच्या उत्तर भागातील हक्कांसाठी लंडनच्या सत्तेशी घेतलेल्या या थेट पंग्यामुळे मीडिया आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांना ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेचा संदर्भ देत ‘किंग ऑफ द नॉर्थ’ ही पदवी दिली.

महापौर म्हणून दमदार कामगिरी; पण संपूर्ण देशाचे नेतृत्व करण्याचे मोठे आव्हान

ग्रेटर मँचेस्टरचे महापौर म्हणून काम करताना बर्नहॅम यांनी तिथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी ‘बी नेटवर्क’ नावाचा एकात्मिक प्रकल्प यशस्वीपणे राबवला, ज्याने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्यांनी गरिबांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती आणि कौशल्य विकास कार्यक्रमांवर मोठा भर दिला.

पोटनिवडणुकीत विजय मिळवून संसदेत परत येताच स्टारमर यांनी राजीनामा दिला. त्यामुळे पंतप्रधान झाल्यास देशात मुदतपूर्व निवडणुका घेणार का, असा प्रश्न रॉयटर्सने त्यांना विचारला असता, “सध्या हा विचार करणे खूप घाईचे ठरेल,” असे सांगत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.

लेबर पार्टी सध्या अंतर्गत वाद आणि घसरत्या लोकप्रियतेचा सामना करत आहे. अशा वेळी सामान्य कामगार वर्गाला पुन्हा पक्षाशी जोडण्याची क्षमता बर्नहॅम यांच्यात असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र, केवळ उत्तर ब्रिटनपुरती मर्यादित असलेली त्यांची प्रतिमा त्यांना संपूर्ण देशाचा नेता बनवणार का, हाच आता सर्वात मोठा प्रश्न आहे.

हे देखील वाचा – Kunal Shah WhatsApp Head: भारतीय उद्योजकाचा डंका! ‘CRED’ चे संस्थापक कुणाल शाह सांभाळणार व्हॉट्सअ‍ॅपची जागतिक धुरा

Web Title:
संबंधित बातम्या