Home / महाराष्ट्र / Ketan Agrawal Siya Goyal : केतन अग्रवाल हत्या प्रकरण: पोलीस कोठडी संपण्यापूर्वी तपासाला वेग; संशयित सिया गोयलच्या घरातून कपडे जप्त, कटात अन्य कोणाचा सहभाग?

Ketan Agrawal Siya Goyal : केतन अग्रवाल हत्या प्रकरण: पोलीस कोठडी संपण्यापूर्वी तपासाला वेग; संशयित सिया गोयलच्या घरातून कपडे जप्त, कटात अन्य कोणाचा सहभाग?

Ketan Agrawal Siya Goyal : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला आता कमालीचा वेग आला असून, मुख्य संशयित आरोपी...

By: Team Navakal
Ketan Agrawal Siya Goyal
Social + WhatsApp CTA

Ketan Agrawal Siya Goyal : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला आता कमालीचा वेग आला असून, मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीची मुदत उद्या, ३ जुलै रोजी संपत आहे. वडगाव न्यायालयाने या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपण्यापूर्वी पुणे ग्रामीण आणि लोणावळा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, नुकतेच आरोपींना लोहगड किल्ल्यावर नेऊन हत्येच्या थराराचे ‘क्राइम सीन रिक्रिएशन’ (गुन्ह्याची पुर्नरचना) करण्यात आले. यापाठोपाठ आज पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी थेट सिया गोयलच्या निवासस्थानी जाऊन झाडाझडती घेतली.

‘लीलाकुंज’ निवासस्थानी पोलिसांचा छापा; कपडे आणि महत्त्वाचे साहित्य जप्त
पुण्यातील कोंढवा भागात असलेल्या ‘लीलाकुंज’ या सिया गोयलच्या निवासस्थानी पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक आज तिला सोबत घेऊन पोहोचले. १८ जून रोजी घडलेल्या या गुन्ह्याच्या दिवशी सियाने नेमके कोणते कपडे परिधान केले होते, ते शोधणे आणि जप्त करणे हा पोलिसांचा मुख्य उद्देश होता. कायदेशीर प्रक्रियेनुसार, घटनास्थळावरून आणि आरोपीच्या घरातून पुरावे गोळा करण्यासाठी पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी सियाच्या घरातून तिचे ते कपडे आणि भ्रमणध्वनी (मोबाईल) जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान पोलीस अधिकारी साधारणपणे एक तास घरात ठाण मांडून होते. धक्कादायक बाब म्हणजे, केतन अग्रवालला लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलण्याचा संपूर्ण कट याच घरात सिया आणि चेतन चौधरीने रचला होता, तसेच त्याची कथितरीत्या पूर्वतयारी (तालीम) देखील याच ठिकाणी केली होती, असा पोलिसांचा संशय आहे. या तपास प्रक्रियेदरम्यान सियाचे कुटुंबीय देखील घरात उपस्थित होते.

पुराव्यांची छेडछाड आणि कट रचल्याचा संशय
गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा किंवा त्यात फेरबदल करण्याचा प्रयत्न सियाकडून झाला आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. उद्या या दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी संपत असल्याने आजचा दिवस तपासाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक मानला जात आहे. आतापर्यंत गोळा केलेले भौतिक पुरावे, आरोपींची कसून केलेली चौकशी आणि तपासातील प्रगती यावरच पोलिसांची पुढील कायदेशीर रणनीती अवलंबून असणार आहे.

लोणावळा पोलिसांची संशयाची सुई नेमकी कोणाकडे?
केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी सिया आणि चेतन चौधरी जरी गजाआड असले, तरी या संपूर्ण कटात केवळ हे दोघेच सामील होते की त्यांना पडद्यामागून अन्य कोणाची फूस होती, या अँगलने लोणावळा पोलीस तपास करत आहेत. हा कट अत्यंत पूर्वनियोजित असल्याने यात आणखी काही त्रयस्थ व्यक्तींचा सहभाग असण्याची दाट शक्यता पोलिसांना वाटत आहे. न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर करतानाही पोलिसांनी याच मुद्द्यावर भर दिला होता.

या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत सियाचा भाऊ साहिल, वडील प्रवीण आणि आई पूजा या संपूर्ण गोयल कुटुंबीयांची सखोल चौकशी केली आहे. याशिवाय, केतन आणि सियाचे लग्न ठरवण्यात मध्यस्थी करणाऱ्या मित्तल दाम्पत्याचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच, बाली येथे प्री-वेडिंग शूटसाठी जाताना या जोडप्याला मुंबई विमानतळापर्यंत सोडणाऱ्या कॅब चालकाचीही पोलिसांनी चौकशी करून त्या दिवसाचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या
Sakinaka Manhole

Sakinaka Manhole : मुंबईतील साकीनाका मॅनहोल दुर्घटना: शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू; पालिकेच्या कारभारावर तीव्र संताप-अजून किती निष्पाप बळी घेणार? संजय घाडींचा अश्विनी भिडेंवर थेट रोख..