Home / लेख / Oppo चा बाजारात धमाका! 50MP सेल्फी कॅमेरा आणि 7000mAh बॅटरीसह नवीन 5G स्मार्टफोन सीरिज लाँच, पाहा किंमत

Oppo चा बाजारात धमाका! 50MP सेल्फी कॅमेरा आणि 7000mAh बॅटरीसह नवीन 5G स्मार्टफोन सीरिज लाँच, पाहा किंमत

Oppo Reno 16 Series Launch: टेक जगतात आपला दबदबा कायम ठेवत ओप्पोने भारतीय बाजारपेठेत आपली बहुप्रतीक्षित Oppo Reno 16 Series...

By: Team Navakal
Oppo चा बाजारात धमाका! 50MP सेल्फी कॅमेरा आणि 7000mAh बॅटरीसह नवीन 5G स्मार्टफोन सीरिज लाँच, पाहा किंमत
Social + WhatsApp CTA

Oppo Reno 16 Series Launch: टेक जगतात आपला दबदबा कायम ठेवत ओप्पोने भारतीय बाजारपेठेत आपली बहुप्रतीक्षित Oppo Reno 16 Series Launch अधिकृतपणे जाहीर केली आहे. या नव्या फ्लॅगशिप सीरिजमध्ये कंपनीने Oppo Reno 16 आणि Oppo Reno 16c हे दोन दमदार ५G स्मार्टफोन सादर केले आहेत.

हे दोन्ही स्मार्टफोन 9 जुलै 2026 पासून अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, ओप्पो ई-स्टोअर आणि प्रमुख रिटेल आउटलेट्सवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. ग्राहकांना हे फोन स्टार्री व्हाईट, स्टेलर पर्पल आणि ट्वायलाइट व्हायलेट अशा तीन आकर्षक रंगांमध्ये खरेदी करता येतील.

Oppo Reno 16 Series Launch: दोन्ही मॉडेल्सचे व्हेरियंट आणि किंमतीची संपूर्ण माहिती

कंपनीने दोन्ही फोन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज पर्यायांमध्ये आणले आहेत, त्यांचे दर खालीलप्रमाणे आहेत:

Oppo Reno 16 च्या किंमती:

  • 8GB रॅम + 256GB स्टोरेज: 61,999 रुपये
  • 12GB रॅम + 256GB स्टोरेज: 67,999 रुपये

Oppo Reno 16c च्या किंमती:

  • 8GB रॅम + 128GB स्टोरेज: 46,999 रुपये
  • 8GB रॅม + 256GB स्टोरेज: 49,999 रुपये
  • 12GB रॅम + 256GB स्टोरेज: 55,999 रुपये

लाँच ऑफर्सचा पाऊस; ग्राहकांसाठी बंपर सवलती

नवीन सीरिजच्या खरेदीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ओप्पोने अनेक भन्नाट ऑफर्स दिल्या आहेत:

  • निवडक बँक क्रेडिट कार्ड आणि युपीआय व्यवहारांवर तब्बल 10 टक्क्यांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल.
  • ग्राहकांसाठी 18 महिन्यांपर्यंत विना व्याज ईएमआय म्हणजेच झिरो डाऊन पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे.
  • जुना फोन एक्सचेंज केल्यास 5,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त बोनस दिला जाईल.
  • सुरक्षेसाठी 180 दिवसांचे मोफत स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन आणि सोबत ओप्पो एन्को बड्स 3 प्रो प्लसवर थेट 50 टक्क्यांची सूट मिळेल.

Oppo Reno 16 Series Launch: दमदार परफॉर्मन्स आणि ७,०००mAh ची शक्तिशाली बॅटरी

दोन्ही उपकरणांच्या रचनेमध्ये आणि अंतर्गत भागांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत:

  • प्रोसेसर आणि मेमरी: रेनो 16 मॉडेलमध्ये शक्तिशाली क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 प्रोसेसरसह 12GB पर्यंत रॅम मिळतो. तर रेनो 16c मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7300 चिपसेट वापरण्यात आला आहे. हे दोन्ही फोन अँड्रॉइड 16 वर आधारित कलरओएस 16 वर चालतात.
  • डिस्प्ले गुणवत्ता: रेनो 16 मध्ये 6.32 इंचाचा एमोलेड डिस्प्ले असून त्याची पीक ब्राइटनेस 1,800 निट्स आहे. दुसरीकडे रेनो 16c मध्ये 6.57 इंचाचा मोठा एमोलेड डिस्प्ले असून 1,400 निट्स ब्राइटनेस आहे. दोन्ही फोन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात.
  • बॅटरी आणि चार्जिंग: दीर्घकाळ बॅकअपसाठी रेनो 16 मध्ये 6,700mAh ची तर रेनो 16c मध्ये तब्बल 7,000mAh ची महाकाय बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही फोन 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.
  • टिकाऊपणा: धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या फोनला IP66, IP68 आणि IP69 सारख्या सर्वोच्च रेटिंग मिळाल्या आहेत.

Oppo Reno 16 Series Launch: कॅमेरा प्रेमींसाठी मेजवानी; ५०MP चा सेल्फी कॅमेरा

फोटोग्राफीसाठी ओप्पोने नेहमीप्रमाणेच सर्वोत्तम कॅमेरा सेटअप दिला आहे. दोन्ही फोनच्या पुढील भागात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

मागील कॅमेऱ्याचा विचार केल्यास, रेनो 16 मध्ये ५० मेगापिक्सलचा सोनी मुख्य कॅमेरा, ५० मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड आणि ५० मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा दिला आहे. रेनो 16c मध्येही मुख्य आणि टेलिफोटो कॅमेरा समान आहे, परंतु यात ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड कॅमेरा मिळतो. सुरक्षिततेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कनेक्टिव्हिटीसाठी ५G, ब्लूटूथ ५.४ आणि यूएसबी टाईप-सी सारखे सर्व आवश्यक फीचर्स समाविष्ट आहेत.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या