Home / महाराष्ट्र / Uddhav Thackeray : उबाठातर्फे रविवारपासून राज्यव्यापी रामरक्षा आंदोलन

Uddhav Thackeray : उबाठातर्फे रविवारपासून राज्यव्यापी रामरक्षा आंदोलन

Uddhav Thackeray : उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अयोध्या दानचोरीला विरोध करण्यासाठी येत्या रविवारपासून राज्यव्यापी रामरक्षा...

By: Team Navakal
Aditya Thackeray
Social + WhatsApp CTA

Uddhav Thackeray : उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अयोध्या दानचोरीला विरोध करण्यासाठी येत्या रविवारपासून राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली.


उद्धव ठाकरे म्हणाले की, संपूर्ण देश भाजपाच्या अंमलाखाली आहे. आम्हीही भाजपासोबत होतो. राममंदिरासाठी आंदोलनात आम्ही सहभागी होतो. भाजपा  राम मंदिराचे भांडवल करून सत्तेत आले. आज दुर्दैवाने राम मंदिराबाबत वेगळी चर्चा सुरू आहे. राम मंदिरावर दरोडा टाकला गेला आहे. काहींच्या मते हा पैसा फोडाफोडीसाठी वापरला जात आहे. परंतु आता हिंदु माफ नहीं करेंगा असे
आम्ही म्हणतो.


रविवारी 5 जुलैला सायंकाळी 4 वाजता दादर कबुतरखाना येथे मारुती मंदिरासमोर तमाम रामभक्त, हिंदूंनी यावे. मी व माझे नेते तिथे  असणार आहोत. आम्ही मंदिरासमोर रामरक्षा म्हणू, हनुमान स्तोत्र म्हणू, हनुमान चालिसा म्हणणार आहोत. पक्ष सोडून सर्वांना येण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत. यानंतर राज्यभर, खेड्यापाड्यात जिथे हनुमान मंदिर असेल तिथे हे आंदोलन होईल. जे हिंदुंच्या भावनेशी खेळून राममंदिर लुटत आहेत ते देशद्रोह करत आहेत. मुंबईतील उत्तर भारतीयांनीही या आंदोलनात सामील व्हावे, असे मी आवाहन करतो आहे.


थेट अयोध्येला जाऊन जाब का विचारत नाही. या प्रश्नावर ते म्हणाले की, मी अयोध्येला जाईनच, पण महाराष्ट्र जागा झाला पाहिजे. हिंदू जागे झाले आहेत, ते जाब विचारतील. राम मंदिरात जे चोरी करीत होते त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. गाव, खेड्यात कसे आंदोलन होईल त्याचे वेळापत्रक जाहीर करू. जे चोर आहेत त्यांना राज्यपाल किंवा मंत्री बनवू नये, त्यांना शिक्षा झाली पाहिजे यासाठी हे आंदोलन आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या