Home / लेख / Asus Vivobook 15 Launch: भारतात Asus चा नवा एआय लॅपटॉप लाँच! पहिल्यांदाच इंटेलच्या प्रगत प्रोसेसरचा वापर; डिस्काउंटसह पाहा किंमत आणि फीचर्स

Asus Vivobook 15 Launch: भारतात Asus चा नवा एआय लॅपटॉप लाँच! पहिल्यांदाच इंटेलच्या प्रगत प्रोसेसरचा वापर; डिस्काउंटसह पाहा किंमत आणि फीचर्स

Asus Vivobook 15 Launch: प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी असुसने भारतीय बाजारात आपला अत्याधुनिक लॅपटॉप Asus Vivobook 15 Launch अधिकृतपणे जाहीर केला...

By: Team Navakal
Asus Vivobook 15 Launch: भारतात Asus चा नवा एआय लॅपटॉप लाँच! पहिल्यांदाच इंटेलच्या प्रगत प्रोसेसरचा वापर; डिस्काउंटसह पाहा किंमत आणि फीचर्स
Social + WhatsApp CTA

Asus Vivobook 15 Launch: प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी असुसने भारतीय बाजारात आपला अत्याधुनिक लॅपटॉप Asus Vivobook 15 Launch अधिकृतपणे जाहीर केला आहे. हा नवीन लॅपटॉप नवीन इंटेल कोर 5 सिरीज 3 या अत्यंत शक्तिशाली प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या नवीन आणि प्रगत चिपसेटचा वापर करून भारतात लाँच झालेला हा देशातील पहिलाच लॅपटॉप आहे.

रोजच्या वापरातील गरजा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेशी (AI) संबंधित कामे जलद गतीने करण्यासाठी या लॅपटॉपमध्ये एआय-रेडी हार्डवेअर देण्यात आले आहे. या नव्या मॉडेलच्या लाँचिंगसोबतच कंपनीने ग्राहकांसाठी असुस टफ गेमिंग A15 (TUF Gaming A15) हा नवा गेमिंग लॅपटॉप देखील बाजारात आणला आहे.

किंमत, आकर्षक ऑफर्स आणि रंग पर्याय

अ‍ॅमेझॉन प्राईम डे आणि फ्लिपकार्ट गोट (GOAT) सेलचे औचित्य साधून कंपनीने या लॅपटॉपच्या किमतीवर मोठी सवलत जाहीर केली आहे:

  • सवलतीमधील किंमत: या लॅपटॉपची मूळ छापील किंमत (MRP) 1,59,990 रुपये आहे. मात्र, सेलमध्ये यावर 33 टक्के इतका मोठा डिस्काउंट दिला जात असून तो ग्राहकांना 1,07,990 रुपयांना खरेदी करता येईल.
  • बँक आणि ईएमआय ऑफर्स: हा लॅपटॉप खरेदी करताना ग्राहक वेगवेगळ्या बँकांच्या ऑफर्स, जुन्या उपकरणांवर मिळणारा एक्सचेंज बोनस आणि 9 महिन्यांपर्यंतचा नो-कॉस्ट ईएमआय पर्याय निवडू शकतात.
  • उपलब्ध रंग: हा लॅपटॉप बाजारात कूल सिल्वर, क्वाइट ब्लू आणि टेरा केंटा या 3 रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

यासोबतच लाँच झालेल्या असुस टफ गेमिंग A15 ची मूळ किंमत 1,55,990 रुपये आहे. परंतु, 24 टक्के सूट मिळाल्यानंतर हा गेमिंग लॅपटॉप 1,18,990 रुपयांच्या लाँचिंग किमतीत ग्रेफाइट ब्लैक रंगात खरेदी करता येईल.

असुस विवोबुक १५ चे दमदार फीचर्स

असुसच्या या लॅपटॉपमध्ये प्रगत मानकांचा वापर करण्यात आला असून त्याची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • डिस्प्ले आणि प्रोसेसर: यामध्ये 15.6 इंच आकाराचा फुल-एचडी अँटी-ग्लेयर डिस्प्ले दिला आहे. यात इंटेल कोर 5 सिरीज 3 प्रोसेसर असून सोबत इंटेल एआय बूस्ट एनपीयू (NPU) मिळतो, जो एआयच्या कामांसाठी 16 TOPS पर्यंतची गती प्रदान करतो.
  • मेमरी आणि स्टोरेज: वेगवान कामगिरीसाठी यात 16GB क्षमतेची DDR5 रॅम आणि फाईल्स साठवण्यासाठी 512GB क्षमतेची वेगवान एसएसडी (SSD) स्टोरेज स्पेस मिळते.
  • सुरक्षा आणि डिझाईन: व्हिडिओ कॉलिंगसाठी यात प्रायव्हसी शटर असलेला एचडी वेबकॅम दिला आहे. सुरक्षेसाठी बायोमेट्रिक फिंगरप्रिंट सेन्सर आणि कीबोर्डवर मायक्रोसॉफ्ट कोपायलटसाठी स्वतंत्र बटण (की) देण्यात आले आहे.
  • वजन आणि बॅटरी: मिलिट्री-ग्रेड टिकाऊपणाचे मानांकन मिळालेल्या या लॅपटॉपचे वजन केवळ 1.7 किलोग्राम आहे. यामध्ये 42Wh क्षमतेची बॅटरी असून कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 6 चा सपोर्ट मिळतो.

असुस टफ गेमिंग A15 चे खास फीचर्स

गेमिंगचे शौकीन असणाऱ्या युजर्ससाठी हा लॅपटॉप एक उत्तम पर्याय ठरू शकतो:

  1. प्रोसेसर आणि ग्राफिक्स: हा लॅपटॉप एएमडी रायझेन 7 8845HS (AMD Ryzen 7 8845HS) प्रोसेसरसह येतो. यात गेमिंगसाठी 4GB ग्राफिक्स मेमरी असलेले एनव्हिडिया जिफोर्स आरटीएक्स 3050 (Nvidia GeForce RTX 3050) ग्राफिक्स कार्ड दिले आहे.
  2. रिफ्रेश रेट: गेमिंगचा स्मूथ अनुभव देण्यासाठी यात 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करणारा 15.6 इंच फुल-एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यातही 16GB रॅम आणि 512GB एसएसडी स्टोरेज मिळते.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या