Home / महाराष्ट्र / Kia च्या ‘या’ कारवर डिस्काउंटमध्ये मोठी वाढ! आता मिळणार तब्बल 70,000 रुपयांची थेट सूट

Kia च्या ‘या’ कारवर डिस्काउंटमध्ये मोठी वाढ! आता मिळणार तब्बल 70,000 रुपयांची थेट सूट

Kia Syros Price Drop : किआ इंडियाच्या ताफ्यातील किआ सायरॉस (Kia Syros) ही कार तिच्या उत्कृष्ट डिझाइन आणि आधुनिक वैशिष्ट्यांमुळे...

By: Team Navakal
Kia च्या 'या' कारवर डिस्काउंटमध्ये मोठी वाढ! आता मिळणार तब्बल 70,000 रुपयांची थेट सूट
Social + WhatsApp CTA

Kia Syros Price Drop : किआ इंडियाच्या ताफ्यातील किआ सायरॉस (Kia Syros) ही कार तिच्या उत्कृष्ट डिझाइन आणि आधुनिक वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेते. मात्र, कंपनीच्या इतर गाड्यांच्या तुलनेत या कारची विक्री काहीशी कमी आहे. हाच सेल्सचा आलेख उंचावण्यासाठी कंपनीने जुलै महिन्यात एक अत्यंत आकर्षक योजना आणली आहे.

कंपनीने या कारवर दिल्या जाणाऱ्या डिस्काउंटमध्ये मोठी वाढ केली आहे. आधी या कारवर केवळ 50,000 रुपयांपर्यंतची सूट मिळत होती. मात्र, आता ती वाढवून तब्बल 70,000 रुपये करण्यात आली आहे.

मॉडेलनुसार मिळणारा डिस्काउंट:

  • 2025 चे मॉडेल: जर तुम्ही या कारचे 2025 चे मॉडेल खरेदी केले, तर तुम्हाला पूर्ण 70,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.
  • 2026 चे मॉडेल: या कारच्या अगदी नवीन म्हणजेच 2026 च्या मॉडेलवर ग्राहकांना 65,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8,39,900 रुपये आहे. ग्राहकांना कमी बजेटमध्ये जास्त फीचर्स देण्याच्या उद्देशाने कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात या कारचे नवीन HTK (EX) व्हेरियंट देखील लाँच केले होते. या कारच्या संपूर्ण लाइन-अपमध्ये एकूण 7 ट्रिम्स उपलब्ध आहेत.

नवीन HTK (EX) व्हेरियंटचे प्रीमिअम फीचर्स आणि लुक

हे नवीन व्हेरियंट जुन्या मॉडेलपेक्षा अधिक प्रगत असून यात अनेक उत्कृष्ट कॉस्मेटिक आणि अंतर्गत बदल करण्यात आले आहेत:

  • बाह्य डिझाईन: कारच्या बाहेरील भागात एलईडी डीआरएल्स, आकर्षक एलईडी हेडलाईट्स आणि एलईडी टेल लॅम्प्स देण्यात आले आहेत. याशिवाय कारला अधिक स्पोर्टी लुक देण्यासाठी R16 आकाराचे अलॉय व्हील्स मिळतात.
  • आतील सुविधा: शहरी ग्राहकांची गरज लक्षात घेऊन यात इलेक्ट्रिक सनरूफ, 12.3 इंचाची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, इलेक्ट्रिकली अ‍ॅडजस्टेबल आणि फोल्डेबल ओआरव्हीएम्स (बाहेरील आरसे) आणि सेन्सरसह येणारा रियर पार्किंग कॅमेरा देण्यात आला आहे.

सुरक्षेच्या बाबतीत ५-स्टार मानांकन; २० पेक्षा जास्त स्टँडर्ड फीचर्स

किआ सायरॉस ही सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत विश्वासार्ह मानली जाते. किआच्या मजबूत K1 प्लॅटफॉर्मवर आधारित असलेल्या या कारला ‘भारत NCAP’ क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.

कारमधील प्रमुख सुरक्षा फीचर्स:

यासोबतच कंपनीने ग्राहकांच्या मागणीचा विचार करून या नवीन ट्रिममध्ये डिझेल इंजिनचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे जास्त प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक परवडणारा आणि व्यावहारिक पर्याय ठरतो.

  • एकूण 6 एअरबॅग्ज (सर्व मॉडेलमध्ये स्टँडर्ड)
  • ईबीडीसह एबीएस (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम)
  • इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल
  • हिल स्टार्ट असिस्ट आणि व्हीकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट
Web Title:
संबंधित बातम्या