Home / News / Spain to Face France, Argentina to Take on England in World Cup Semi-Finals : उपांत्य फेरीत स्पेन-फ्रान्स, अर्जेंटिना-इंग्लंड लढत

Spain to Face France, Argentina to Take on England in World Cup Semi-Finals : उपांत्य फेरीत स्पेन-फ्रान्स, अर्जेंटिना-इंग्लंड लढत

Spain to Face France, Argentina to Take on England in World Cup Semi-Finals – मियामी स्टेडियमवर विश्वचषकाच्या तिसर्‍या उपांत्यपूर्व सामन्यात...

By: Team Navakal
Spain to Face France, Argentina to Take on England in World Cup Semi-Finals
Social + WhatsApp CTA



Spain to Face France, Argentina to Take on England in World Cup Semi-Finals – मियामी स्टेडियमवर विश्वचषकाच्या तिसर्‍या उपांत्यपूर्व सामन्यात नॉर्वेला २-१ ने विजय मिळवून इंग्लंडने विश्वचषकाच्या इतिहासात चौथ्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली, तर कॅन्सस सिटीत झालेल्या रोमांचक चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात अर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला ३-१ ने मात देत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. १५ जुलैला पहिल्या उपांत्य फेरीत स्पेन आणि फ्रान्सची लढत होणार आहे, तर आता १६ जुलैला दुसर्‍या उपांत्य फेरीत अर्जेंटिना इंग्लंडशी भिडणार आहे. या स्पर्धेचा महाअंतिम सामना २० जुलै रोजी होणार आहे. दोन्ही लढती भारतीय वेळेनुसार मध्यरात्री साडेबारा वाजता होणार आहेत.

२०१० मध्ये जोहान्सबर्गमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आंद्रेस इनिएस्टाने ११६ व्या मिनिटाला गोल करुन स्पेनला पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून दिला होता. त्यानंतर स्पेनला विश्वचषक जिंकता आला नाही. फ्रान्सने मायदेशात १९९८ च्या विश्वचषकात अंतिम सामन्यात ब्राझीलचा ३-० असा पराभव करत पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला होता. २०१८मध्ये रशियामध्ये झालेल्या २०१८ च्या विश्वचषकात फ्रान्सने अंतिम सामन्यात क्रोएशियाचा ४-२ असा पराभव करत दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली होती. अर्जेंटिनाने १९७८, १९८६ आणि २०२२मध्ये असे तीनवेळा फिफा विश्वचषक जिंकला. १९६६ मध्ये इंग्लंडने वेस्ट जर्मनीचा ४-२ असा पराभव करून पहिल्यांदाच जेतेपद पटकावले होते. त्यानंतर इंग्लंडला विश्वचषकावर नाव कोरता आले नाही.

Web Title:
संबंधित बातम्या