Home / देश-विदेश / E20 Petrol Survey: गडकरींच्या आव्हानानंतर समोर आला धक्कादायक सर्व्हे! निम्म्याहून अधिक वाहनधारकांचा E20 पेट्रोल वापरण्यास नकार

E20 Petrol Survey: गडकरींच्या आव्हानानंतर समोर आला धक्कादायक सर्व्हे! निम्म्याहून अधिक वाहनधारकांचा E20 पेट्रोल वापरण्यास नकार

E20 Petrol Survey: केंद्र सरकारच्या इथॅनॉल मिश्रित इंधन धोरणाला वाहनधारकांकडून मोठा विरोध होताना दिसत आहे. नुकत्याच समोर आलेल्या सी-व्होटरच्या एका...

By: Team Navakal
E20 Petrol Survey: गडकरींच्या आव्हानानंतर समोर आला धक्कादायक सर्व्हे! निम्म्याहून अधिक वाहनधारकांचा E20 पेट्रोल वापरण्यास नकार
Social + WhatsApp CTA

E20 Petrol Survey: केंद्र सरकारच्या इथॅनॉल मिश्रित इंधन धोरणाला वाहनधारकांकडून मोठा विरोध होताना दिसत आहे. नुकत्याच समोर आलेल्या सी-व्होटरच्या एका सर्वेक्षणातून हा धक्कादायक खुलासा झाला आहे. देशातील निम्म्याहून अधिक वाहनधारकांनी त्यांच्या गाड्यांमध्ये E20 पेट्रोल वापरण्यास स्पष्ट नकार दिला आहे. इथॅनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे इंजिन खराब होऊ शकते आणि गाडीचे मायलेज कमी होऊ शकते, अशी भीती वाहनधारकांच्या मनात घर करून राहिली आहे.

विशेष म्हणजे, सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या म्हणजेच एनडीएच्या स्वतःच्या मतदार वर्गातही या इंधनाबाबत तीव्र चिंता आहे. सरकारच्या या इंधन धोरणाला पाठिंबा देण्यापेक्षा स्वतःच्या वाहनाची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास लोक जास्त महत्त्व देत असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

सी-व्होटर सर्वेक्षणाची आकडेवारी; कोणी काय दिली प्रतिक्रिया?

रिपोर्टनुसार, या सर्वेक्षणात वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीच्या मतदारांना E20 पेट्रोलच्या वापराबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

  • एनडीए समर्थकांपैकी 52.5 टक्के मतदारांनी या पेट्रोलचा वापर करणार नसल्याचे सांगितले, तर केवळ 18.1 टक्के लोकांनी याला पसंती दिली. उर्वरित 29.5 टक्के लोकांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
  • विरोधी पक्षाच्या समर्थकांमध्ये हा विरोध आणखी तीव्र असून तब्बल 57.9 टक्के मतदारांनी E20 पेट्रोल नाकारले आहे.
  • इतर राजकीय पक्षांशी जोडलेल्या 55 टक्के मतदारांनी देखील या नवीन इंधनाचा वापर करण्यास नकार दिला आहे.
  • देशातील एकूण मतदारांचा विचार केला तर तब्बल 55.1 टक्के लोकांनी E20 पेट्रोल वापरायला नकार दिला असून केवळ 17.1 टक्के लोकांनी याला होकार दिला आहे.

नितीन गडकरींचे आव्हान आणि आंदोलकांचा प्रतिआव्हानाचा पवित्रा

हा सर्व्हे अशा वेळी समोर आला आहे जेव्हा काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी E20 पेट्रोलच्या विरोधकांना जाहीर आव्हान दिले होते. इथॅनॉल मिश्रित इंधनामुळे गाडीचे नुकसान झाले आहे, असा एकतरी माणूस समोर आणून दाखवावा, असे गडकरी म्हणाले होते.

मंत्र्यांचे हे आव्हान आंदोलकांनी स्वीकारले असून त्यांनी एक नाही तर चक्क 6 अशा व्यक्तींना समोर आणण्याची तयारी दर्शवली आहे, ज्यांच्या गाड्यांचे नुकसान E20 पेट्रोल वापरल्यामुळे झाले आहे. मात्र, मीडियाशी बोलण्यापूर्वी नितीन गडकरी यांनी स्वतः आपली भेट घ्यावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.

पेट्रोल स्वस्त मिळाले तर वापरणार का? पाहा आकडेवारी

या सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आले की, जर E20 पेट्रोल नेहमीच्या पेट्रोलपेक्षा स्वस्त दरात विकले गेले, तर तुम्ही ते वापराल का? यावर मिळालेली उत्तरे खालील तक्त्यामध्ये दिली आहेत:

मतदार वर्गहोय (वापरणार)नाही (वापरणार नाही)सांगू शकत नाही
एनडीए मतदार43.8%35.4%20.8%
विरोधी पक्ष मतदार38%45.8%16.2%
इतर मतदार39.8%40.2%19.9%
एकूण सरासरी40.8%40.4%18.8%

यावरून असे दिसून येते की, जर सरकारने या पेट्रोलचे दर कमी केले, तर एनडीएचे काही मतदार ते वापरण्यास तयार होऊ शकतात, परंतु तरीही विरोधकांचा एक मोठा वर्ग किंमत कमी झाल्यावरही हे इंधन वापरण्यास तयार नाही.

Web Title:
संबंधित बातम्या